ताज्या बातम्या

Politics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Politics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मुख्यमंत्री औरंगाबादेत, चर्चा, बैठका सुरू

Written By Aurangabadlive on शनिवार, २५ मे, २०१३ | १०:३४ AM


औरंगाबाद : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काल रात्री नऊच्या सुमारास विमानाने औरंगाबादेत आले.चिकलठाणा विमानतळावर त्यांचे स्वागत झाले. सुभेदारी गेस्ट हाऊसवर त्यांच्याकडे गèहाणे मांडण्यासाठी अनेक शिष्टमंडळे प्रतीक्षा करीत होती. येथे त्यांनी त्यांची निवेदने स्वीकारली.  यावेळी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हेही उपस्थित होते. पाच कोटी आणि साडेआठ कोटी रुपये याप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारकडून अर्थसाह्य उपलब्ध करून दिल्याबद्दल जायकवाडीतून कालवे काढण्यात आले आणि त्याद्वारेच औरंगाबाद शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. याबद्दल त्यांना कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी धन्यवाद दिले. आज मुख्यमंत्री जायकवाडीला जाऊन काम पाहणी  करत आहेत. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त असलेल्या सिल्लोड तालुक्यातील खेळणा प्रकल्पातील कामेही ते पाहणार आहेत.

औरंगाबादेत शिवसेनेची निदर्शने

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २४ मे, २०१३ | १०:०५ AM



औरंगाबाद : शिवसेनेने आज पोलीस आयुक्तालयासमोर मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमिन (एमआयएम)चे खा. असदुद्दीन ओवेसी यांना पोलीस प्रशासनाने शहरात भाषणास परवानगी दिल्याच्या विरोधात निदर्शने केली. 
यावेळी खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आ. प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा, संतोष जेजूरकर, जयवंत ओक, गजानन बारवाल, सुशील
खेडकर, सुनीता आऊलवार, मीरा देशपांडे, अनिता मंत्री, प्रतिभा जगताप यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री आज औरंगाबादेत


औरंगाबाद : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज रात्री औरंगाबादेत मुक्कामी येत आहेत. शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी देऊन ते टंचाई निवारणाच्या कामांचा आढावा घेणार आहेत.
चव्हाण यांचे आज रात्री ९ वाजता सुभेदारी विश्रामगृहावर येतील. रात्री मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी ८.३० वाजता ते हर्सूल तलावाकडे रवाना होतील. तेथील कामाची पाहणी करतील. त्यानंतर येथून ते चिकलठाण्याकडे प्रयाण करतील. चिकलठाणा येथे मुख्यमंत्री सकाळी ९.१५ वाजता चारा छावणीस भेट देऊन पाहणी करतील. यानंतर सकाळी ९.३५ वाजता ते चिकलठाणा विमानतळाहून हेलिकॉप्टरने पैठणकडे रवाना होणार आहेत. सकाळी ९.५० वाजता त्यांचे जायकवाडी येथील हेलिपॅडवर आगमन होणार असून, तेथून ते जायकवाडी धरणाकडे प्रयाण करतील. सकाळी १० ते १०.२५ या वेळेत ते जायकवाडी धरणात मनपातर्फे सुरू असलेल्या कालव्याच्या कामाची पाहणी करतील. या पाहणीनंतर ते हेलिकॉप्टरने औरंगाबादेत चिकलठाणा विमानतळावर पोहोचतील. येथून मोटारीने विभागीय आयुक्तालयात आल्यानंतर दुपारी १२ वाजता ते जिल्ह्यातील टंचाईबाबत बैठक घेणार आहेत.  दुपारी १ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेलिकॉप्टरने सिल्लोड तालुक्यातील खेळणा धरणाकडे रवाना होतील. दुपारी १.३० वाजता खेळणा धरण येथे ते जलपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. येथून हेलिकॉप्टरनेच ते सिल्लोड शहरात पोहोचतील.

स्थायी समितीच्या बैठका घेणार


औरंगाबाद : सभापतींच्या विशेषाधिकारात महापालिका स्थायी समितीच्या दोन विशेष बैठका घेण्याच्या हालचाली सुरू आहे. ३० एप्रिल रोजी सदस्य निवडीच्या सभेच्या दिवशी सभापती विकास जैन यांनी दोन बैठका घेतल्या. त्यानंतर बैठका घेता येत नाहीत, असे विधि विभागातून सांगण्यात आले होते. मात्र, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विशेषाधिकारान्वये दोन बैठका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. 

भाजपाच्या महिला आघाडीचा मूकमोर्चा

Written By Aurangabadlive on मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२ | ९:४४ AM

प्रतिनिधी
औरंगाबाद : दिल्लीत विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ भाजपातर्फे सिडको बसस्थानक ते जयभवानीनगरपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. त्या प्रकरणातील दोषींना फासावर लटकवा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मोर्चात भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय महामंत्री विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्ष रेखा पाटील, शहराध्यक्ष मंगला गोसावी, सरचिटणीस वैशाली पारटकर, नगरसेविका कमल नरोटे, साधना सुरडकर, अंजली कोंडेकर, देवयानी सूर्यवंशी, संगीता धुमाळ आदींनी भाग घेतला.

मराठवाडा उपाध्यक्षपदी शेख अहमद

काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या
प्रतिनिधी
औरंगाबाद : प्रदेश काँग्रेस आरोग्य सेवा सेलच्या मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी शेख लईक अहेमद यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना एका कार्यक्रमात माजी खा. उत्तमqसग पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राज्याच्या आरोग्य सेवा सेलचे संयोजक राजाराम देखमुख यांच्या सुचनेनुसार सदरील नियुक्ती  मराठवाडा विभागाचे मुख्य संयोजक शेख जावेद पटेल यांनी केली. शेख लईक यांच्या नियुक्तीनंतर या सेलच्या मराठवाडयाच्या कार्यकारणीत इलीयास खान, औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी अनिस पटेल, औरंगाबाद तालुका सचिवपदी चंद्रप्रभा खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समांतर जलवाहिनीचा मुद्दा अधिवेशनात गाजला

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२ | ९:४८ AM

आ. चव्हाण यांचा तारांकित प्रश्न
प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरातील नागरीकांच्या जिव्हाळ्याचा समांतर जलवाहिनीचा प्रश्न औरंगाबाद महानगरपालिकेला अद्यापही सोडविण्यात आलेला नाही. त्यामुळे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी (दि.१९) हा प्रश्न चांगलाच गाजला. आ.सतीश चव्हाण यांनी समांतर जलवाहिनी संदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाला वाचा फोडली.
औरंगाबाद महानगरपालिकेने समांतर जलवाहिनीसाठी कांचनवाडी येथील जमीन संपादित झाली नसल्याचे उघडीस आले हे खरे आहे काय? समांतर जलवाहिनीला विलंब का झाला? कामाची वर्क ऑर्डर नसताना समांतरच्या ठेकेदाराने काम कसे सुरू केले? शासनाने याची चौकशी केली आहे काय? नसल्यास, विलंबाचे कारण काय? अशा विविध प्रश्नांचा आ. चव्हाण यांनी भडीमार केला. समांतर योजना ठरलेल्या वेळेत पूर्ण होवू न शकल्याने त्याचा खर्च वाढतच असून याचा आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा विचार करता ही योजना राज्य सरकारने चालवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या चर्चेत आ. किशनचंद तनवाणी, आ. विक्रम काळे यांनी देखील सहभाग घेतला. महानगरपालिकेकडे सध्या पैसे नसल्याने या योजनेसाठी शासनाने महानगरपालिकेला अजून १०० कोटी रूपयांची मदत करावी अशी मागणी आ. तनवाणी यांनी यावेळी केली. या प्रश्नांना उत्तर देतांना नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव म्हणाले की, महापालिकेने समांतरची योजना चालवायची क्षमता असेल म्हणूनच ही योजना आणली. केंद्र सरकार व राज्य सरकारने या योजनेसाठी आपला वाटा अगोदरच दिला आहे. आता ही योजना पूर्ण करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असल्याचे सांगितले.
 

अफजल गुरूला फाशी नको, शहीद होईल! : प्रकाश आंबेडकर

Written By Aurangabadlive on शनिवार, १५ डिसेंबर, २०१२ | ६:४३ PM

औरंगाबादेत प्रकाश आंबेडकरांचे विधान
प्रतिनिधी
औरंगाबाद : भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत केलेल्या विधानामुळे राजकीय- सामाजिक वर्तूळात खळबळ उडाली असून, त्यांनी अफजल गुरूला फाशी न देण्याची मागणी केली आहे. त्याला फाशी दिल्यास तो शहीद ठरवला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. काश्मीरमध्ये नेतृत्वहीन झालेली फुटीरतावाद्यांची चळवळ यामुळे पुन्हा एकवटेल आणि काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
कसाबला फासावर चढवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संसद हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला अशाच पद्धतीने फासावर लटकवणार असल्याची घोषणा केली होती. त्या पाश्र्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या या मताला महत्त्व आले आहे. भाजपसह अन्य संघटनांतर्फेही अफजलला तातडीने फाशी देण्याची मागणी होत असताना, प्रकाश आंबेडकर यांनी आज, शनिवारी औरंगाबादेत पत्रपरिषदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, अफजलच्या फाशीच्या संदर्भातील दयेचा अर्ज निकाली काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. त्यावर त्यांनीच निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र सुशीलकुमार यांच्या घोषणेने राष्ट्रपती काँग्रेसच्या मंत्र्यांचे ऐकत असावेत, असे वाटते. अफजल गुरुला फाशी देण्यात येऊ नये. कारण अफजलला फाशी दिल्यास काश्मीरमध्ये असलेल्या फुटीरवादी संघटनांना नवा चेहरा मिळेल. या संघटनांचे बळ एकवटेल. सध्या असंघटितपणे सुरू असलेले त्यांचे आंदोलन संघटित होईल. त्यामुळे मोठा उठाव होईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. गेल्या वीस वर्षांपासून काश्मीरमध्ये असंघटित आणि फुटीरतावाद्यांचे आंदोलन सुरू आहे. तरीही ८० टक्के लोक हे आजही भारताच्या बाजूने आहे, आम्हाला सन्मानाने वागवावे, अशी त्यांची मागणी आहे. वीस वर्षांत काश्मीरच्या फुटीरवाद्यांना नेता मिळाला नाही, तरीही आंदोलन जिवंत आहे. अफजल गुरुला फाशी दिली, तर त्याला हुतात्मा म्हणून जाहीर करतील, या निमित्ताने फुटीरवादी आंदोलनकत्र्यांना नेता मिळेल आणि भविष्यात काश्मीर पेटून उठेल. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला लष्कराद्वारे कंटड्ढोल करत बसणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पत्रपरिषदेला मराठवाडा अध्यक्ष रमेशभाई खंडागळे, प्रा. अविनाश डोळस, गौतम लांडगे, अ‍ॅड. बी. एच. गायकवाड, रामभाऊ पेरकर, जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ आदी उपस्थित होते.

मनपा आयुक्तांना खैरेंनी भरला दम

प्रतिनिधी
औरंगाबाद : चार दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने शहरात अजीत पवार कमबॅक अशी पोस्टर्स लावण्यात आली होती. परवानगी न घेता लावण्यात आल्याने सदरील पोस्टर्स मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काढून टाकायला लावली.
आता मेळाव्याची पोस्टर्सही शहरात जागोजागी लागतांना दिसत आहेत, हे पोस्टर्स मनपा आयुक्त काढतील का, असा प्रश्न खा. खैरे यांना विचारला असता. या मेळाव्याची पोस्टर्स आयुक्त डॉ. भापकरांनी काढून दाखवावीत, असा दम देत शिवसेना स्टाईल दाखवून देऊ, असा इशारा दिला.

स्थायी समिती सभापतीच्या राजीनाम्याची मागणी

Written By Aurangabadlive on मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२ | ११:२४ AM

प्रतिनिधी
लातूर : मनपाच्या स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. समद पटेल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष सुधीर धुत्तेकर यांनी केली असून, कचरा विल्हेवाट करण्याबाबतचे टेंडर स्थायी समितीच्या बैठकीतही रद्द करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या प्रचंड गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर सुधीर धुत्तेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. स्थायी समितीने यापूर्वी चार वेळा कचरा उचलण्या बाबतचे टेंडर नाकारले आहे. मनपाचे आयुक्त रुचेश जयवंशी यांनी जिल्हाधिकारी यांना कचरा प्रकरणी स्थायी समिती निर्णय घेऊ शकत नसल्याचा आरोप केला होता. यामुळे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हाणामारी झाली असल्याचे धुत्तेकर यांनी सांगितले.

१९ ग्रापंचा कारभार महिलांच्या हाती

Written By Aurangabadlive on मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२ | ३:१८ PM

 वैजापूर : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तालुक्यातील २५ पैकी १९  ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हाती आल्या असून यातील ७ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महिलांची वर्णी लागली आहे.तर याशिवाय वक्तीपानव- पानवी ब्रु,हिलालपूर-कोरडगाव,बेलगाव,तिडी-मकरमतपूरवाडी, अव्वलगाव-हमरापूर या ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदावर महिलांची निवड करण्यात आली आहे.१७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत या २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या. तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची नावे पुढीलप्रमाणे- भग्गाव- कारभारी जगताप, शोभा शेटे,कोल्ही-कैलास पवार,ज्ञानेश्वर मगर, पुरणगाव-व्दारकानाथ ठोंबरे,दामुबाई गरुड, कविटखेडा-बिरोळा - विजय बोलधने, गणेश जाधव, डागपिंपळगाव - बबन परमेश्वर, दिपक रोठे, हिंगणेकन्नड - अतुल निकम, निर्मला म्हस्के,नादी- नंदाबाई खिल्लारी, दत्तू नजन, गोलवाडी- मंगल पगार,पाटीलबा कोकाटे,हनुमंतगाव-शोभा भांडे,निरंजन खैरनार, हिलालपूर-कोरडगाव- रुख्मणबाई बोर्डे,मेघा कर्डिले, पानवी खंडाळा/लाख खंडाळा- अलका आहेर, राजेंद्र बावचे , वांजरगाव- संध्या कासार, सय्यद तौसीफ , पानवी ब्रु.- वक्तीपानव-संगीता गुडदे,ज्योती जाधव, तिडी-मकरमतपूरवाडी-शालिनी डुकरे,मंगल आहेर,अव्वलगाव-हमरापूर-कविता सवाई,लता काळे, टुनकी-दस्कुली - सविता गोरे, मच्छिंद्र निकम , कनकसागज - राधा धारबळे , भाऊसाहेब बुट्टे,पारळा- मनीषा आहेर,बाबासाहेब बावके,खरज-तित्तरखेडा-जिजाबाई नारळे,दत्तात्रय कुंदे, महालगाव- सरिता बुट्टे,सुरेश आल्हाट,माळीघोगरगाव-हेमलता पठाडे,संतोष वैराळ,बेलगाव-बेबी सोनवणे,मंगल जगदाळे, नांदूरढोक-बाभूळगावगंगा-अनिता डेंगळे, विनायक गाडे, बाबतारा - सरला त्रिभुवन, बाबासाहेब पानसरे,व रोटेगाव - सुशीला गोरे,धीरजसिंह राजपूत.

व्यावसायिक कर नव्याने

Written By Aurangabadlive on सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२ | ९:२७ AM

प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरातील व्यावसायिक इमारतींना वेगवेगळा कर लावण्यात आल्याचा मुद्दा नगरसेवकांनी स्थायी समितीत मांडला. त्यावर व्यावसायिक इमारतींचे सर्वेक्षण करून नव्याने कर लावण्याच्या  सूचना स्थायी समितीचे सभापती विकास जैन यांनी अधिकाèयांना दिल्या.
महानगरपालिकेत स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत नगरसेवक नारायण राणे यांनी महापौर कला ओझा यांचे वाहन बंद पडत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर शहर अभियंता एम.डी.सोनवणे यांनी अधिकाèयांना खुलासा करण्यास सांगितले. सिरसाठ यांनी  महापौरांची गाडी नवीन असल्याचे केलेल्या खुलाशात सांगितले. परंतु यावर स्थायी समितीचे सभापती व शहर अभियंता सोनवणे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे महापौरांना पर्यायी वाहन देण्याची व्यवस्था करावी व सध्याच्या वाहनाची एजन्सीकडून दुरुस्ती करून अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच नगरसेवक राजू वैद्य यांनी शहरातील व्यावसयिकांना लावण्यात आल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. काही भागातील गरीब नागरिकांना महानगरपालिका कर्मचारी नियमात बसून कर लावतात. मात्र मोठ्या हॉटेल्स, लॉन्स यांच्याकडून कर आकारणी योग्यरित्या झाली नसल्याचे स्पष्ट मत मांडले. त्यावर नगरसेवक बालाजी मुंढे यांनी मंगल कार्यालये, लॉन्स यांना कशापध्दतीने कर आकारला याची माहिती अधिकाèयांनी द्यावी, अशी मागणी सभापतींकडे केली. या प्रश्नांवर खुलासा करताना अधिकाèयांनी काही हॉटेल्सला जुन्या आकाराने व्यावसायिक कर लावला असल्याचे सभेत सांगितले. या मुद्यावर सभापती विकास जैन यांनी व्यावसायिक इमारती, मंगल कार्यालये, मोठ्या हॉटेल्स यांना लावण्यात आलेल्या कराचे सर्वेक्षण करून नव्याने कर लावण्यात यावे, अशा सूचना अधिकाèयांना देण्यात आल्या. याबरोबरच शिलाई मशीनचे त्वरित वाटप करण्यात यावे, अशाही सूचना केल्या.

नेते मातोश्रीवर, कार्यकर्ते टीव्हीजवळ

Written By Aurangabadlive on गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१२ | ११:५२ AM

प्रतिनिधी
औरंगाबाद :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह औरंगाबादमधील जवळपास सर्वच नेते आणि प्रमुख कार्यकर्ते मुंबईत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सामान्य कायकर्ते आणि शहरवासिय बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयीच्या बातम्यांवर लक्ष ठेवून असून,  त्यासाठी टीव्हीसमोर बसून आहेत. काही शिवसैनिकांनी मंदिरात अभिषेक आणि पूजा करून, बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना सुरू केल्या आहेत.
खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह  मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली व बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खैरे यांच्यासोबत शहर आणि मराठवाड्यातील शिवसेना नेते, प्रमुख कार्यकर्ते सध्या मातोश्रीवरच आहेत. शहरात रात्रीपासूनच बाळासाहेबांची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी पसरली. त्यामुळे औरंगाबादच्या दिवाळीवर विरजण पडले आहे. लोकांनी फटाके फोडणेही बंद केले असून, शहरवासिय टीव्हीवरील बातम्यांतून बाळासाहेबांच्या प्रकृती माहिती जाणून घेत आहेत. दरम्यान, औरंगाबादच्या पोलिसांना शांतता- सुव्यवस्था कायम ठेवता यावी, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरातील पोलिसही यंत्रणाही अलर्ट झाली आहे.  बाळासाहेबांप्रती शहरवासियांच्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत.  त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच शहरातील नागरिकांवर चिंतेचे सावट पसरले आहे.

शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

Written By Aurangabadlive on शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२ | १२:०६ PM

प्रतिनिधी
औरंगाबाद :
जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणासाठी वरील धरणांतून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि आनंद गीते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; तथापि आज प्रत्यक्ष मोर्चा निघाला तेव्हा या मोर्चाचे नेतृत्व सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी केले. विशेष म्हणजे कालच खा. चंद्रकांत खैरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी दिवाकर रावते येणार नाहीत, असे ठामपणे सांगितले होते. पाणीप्रश्नावर यापूर्वीही शिवसेनेतील मतभेद व दु‘ळी बाहेर आलेली आहे.
पाणीप्रश्नावरून धडाकेबाज आंदोलन करायला निघालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना दि. ५ रोजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या रोषाला बळी पडावे लागले होते. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीवर दानवे यांनी मोर्चा काढला होता. मात्र, राडा होण्याची शक्यता लक्षात आल्याने खा. खैरे यांनी थोरात यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वः निभावली. यासाठी त्यांनी दानवे यांच्याशी हुज्जत घातली. या गोंधळात दानवे जखमी झाले होते. या पाश्र्वभूमीवर जायकवाडी धरणासाठी वरील धरणांतून पाणी सोडण्यात यावे, शेतमालाला योग्य भाव मिळावा, मराठवाड्यात दुष्काळ
जाहीर करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आज शिवसेनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता निघणारा नियोजित मोर्चा बारा साडे बारा वाजेच्या सुमारास मोर्चा क्रांती चौक येथून निघून विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला. या मोर्चाची माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट आदी उपस्थित होते; पण पत्रकारांशी ‘क्त खा. चंद्रकांत खैरे हेच बोलले. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि आनंद गीते हे करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले होते. दिवाकर रावते या मोर्चासाठी येणार नाहीत का, असे विचारण्यात आले तेव्हा खैरे यांनी ठामपणे नकारार्थी उत्तर दिले होते. पण आज जेव्हा प्रत्यक्षात मोर्चा निघाला तेव्हा त्याचे नेतृत्व दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांनी केल्याचे दिसून आले. मराठवाड्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आल्याने शिवसेनेचा आजचा मोर्चा जोरदार झाला. पण मोर्चाची चर्चा होण्याऐवजी सध्या शिवसेनेतील शितयुद्धाचीच अधिक चर्चा होताना दिसते आहे. या मोर्चात खा. चंद्रकांत खैरे, परभणीचे खासदार गणेशराव दुधगावकर, माजी. मंत्री अर्जुन खोतकर, जयप्रकाश मुंदडा, महापौर कला ओझा, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, शिवसेना उपनेते लक्षणराव वडले, शिवसेना सचिव अनिल देसाई, आ. आर. एम. वाणी, आ. प्रदीप जैस्वाल, आ. मीरा रेंगे, आ. संतोष सांबरे, आ. बंडू जाधव, आ. किसनचंद तनवाणी, आ. संजय शिरसाट, आ. ज्ञानराज चौगुले, आ. ओमराजे qनबाळकर यांच्यासह अनेक माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

ग्रीन बोर्ड खरेदीवर मनसे ठाम

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी ड्यूएल डेस्क खरेदीचा प्रस्ताव मंजुर केला. परंतु  ग्रीन बोर्ड खरेदीवर मनसेचे सभापती अजूनही ठाम राहिलेले असून राजकारणाची दुप्पटी समोर आली आहे.
विद्याथ्र्यांना शाळेत ड्यूएल डेस्क ऐवजी ग्रीन बोर्डची आवश्यकता असल्याचा मुद्दा मनसेने सर्वसाधारण सभेत मांंडला. यावर सत्ताधारी सदस्यांनी विरोध दर्शवित डयुएल डेस्क खरेदी करण्यावर जोर कायम ठेवला आहे. ४५ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा अध्यक्षा नाहिदा बानो पठाण यांनी गोंधळात मंजुर करून घेतला. परंतु शिक्षण समितीच्या बैठकीत ग्रीन बोर्ड खरेदीचा प्रस्ताव मंजुर असताना तो मान्य न केल्याने शिक्षण सभापती व बांधकाम सभापतींनी सभागृह सोडले. दरम्यान, आज शिक्षण समितीचे सभापती बबन कुंडारे यांनी खुलासा करताना मनसे अजूनही ग्रीन बोर्ड खरेदीवर ठाम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळेत आज ड्यूएल डेस्कची गरज नसून ग्रीन बोर्डची आवश्यक आहे. त्यामुळे अध्यक्षांनी मंजुर केलेल्या प्रस्तावाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे जिल्हा परिषद अध्यक्षांनी ड्यूएल डेस्क खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असुन दूसरीकडे मनसे यास विरोध दर्शवित आहे. अशा सत्ताधारी-विरोधी पक्षांमध्ये धुसमस सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

भाषणबाजीनेच रंगली कार्यशाळा

Written By Aurangabadlive on बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१२ | ११:३८ AM

लोकप्रतिनिधींची दांडी, राष्ट्रीय पदाधिकाèयांचे सरकारवर टीकास्त्र
प्रतिनिधी

औरंगाबाद : सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या शेतकरी-शेतमजूर कार्यशाळेत  कार्यशाळेत शेतकèयांच्या समस्यांवर चर्चा होण्याऐवजी आलेल्या पाहुण्यांनी भाषणबाजीवरच भर दिला. त्यामुळे कार्यशाळेसाठी खास उपस्थित असलेले अखिल भारतीय शेतकरी आणि शेतमजूर काँग्रेसचे प्रभारी व नॅशनल कौन्सिलचे सदस्य अविनाश काकडे नाराज झाले. त्यांनी भरसभेत यावर नाराजी व्यक्त करत, स्वपक्षावर टीका केली. ते म्हणाले, शेतकèयांची कार्यशाळा झाली नसून भाषणे रंगली. राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असूनही लोकप्रतिनिधींनी गैरहजेरी लावली! आज शेतकèयांना समस्या भेडसावत आहेत. तहसीलदारांनी लावलेल्या भांडणामुळे शेतकèयांची ६० टक्के प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यावर कठोर कायदा झाला पाहिजे,अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
शहरातील सिडको नाट्यगृहात मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश शेतकरी आणि शेतमजूर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्र्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय किसान खेतमजुर काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास उपासे, जिल्हाध्यक्ष जयराम साळुंके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केशवराव औताडे, माजी खा. उत्तमसिंग पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, अ‍ॅड. शांतीलाल छापरवाल, किरण डोणगावकर, सुभाष ठोकळ, अनिल पटेल, प्रा. डॉ. अरुण खरात, प्रा. डॉ. हरके आदी उपस्थित होते.  काकडे म्हणाले की, थेट गुंतवणूक शेतकèयांच्या फायद्याची आहे. त्यामुळे शेतमालाला उत्तम भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शेतकèयांच्या आत्महत्या वाढत असून त्यावर शासन कमिट्या स्थापन करण्याचे काम करीत आहेत. शेतकèयांना पाणी, वीज, बील वाढीमुळे शेतकèयांचे प्रश्न वाढले आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकèयांचे संघटन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी उपस्थित शेतकèयांना मार्गदर्शन करताना सांगितले. या वेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे म्हणाले की, शेतकèयांनी संघटित होण्याची गरज आहे. संघटनेच्या कार्यकत्र्यांनी राजकारणी माणसाला बळी पडू नये. शेतकèयांवर खर्चाच्या योजना शासनाने आणल्या असल्या तरी त्या शेतकèयांपर्यंत पोहचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अ‍ॅड. शांतीलाल छापरवाल यांनी मानले.

लोह्यात पिचड यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

Written By Aurangabadlive on मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२ | ८:४४ PM

आजी-माजी मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना आव्हान!
प्रतिनिधी
नांदेड : माणिकराव ठाकरे काय बोलत आहेत, हे त्यांनाच कळेनासे  झाले असून, महापालिका निवडणुकीत प्रचारावेळी त्यांनी स्वबळाची भाषा केली. qहमत असेल तर त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवावीच. याची सुरुवात नांदेडपासून करावी, असे आव्हान देत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी स्वबळावर लढण्याचा पुन्हा एकदा नारा दिला. त्यांच्या या जाहीर वक्तव्याने आघाडातील भांडण पुन्हा चव्हाट्यावर आणले आहे. अजित पवार यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी करून राष्ट्रवादीच्या भविष्यातील भूमिकेचे संकेत दिले.
लोहा (जि. नांदेड) येथे प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज, मंगळवारी (दि. ६) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी बोलताना पिचड यांनी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. पिचड म्हणाले, की सध्याच्या राजकारणात सर्वांत जास्त भ्रष्टाचारी कोण? याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर जे चित्र समोर येईल, ते निश्चितच आश्चर्यजनक असेल. आता अवघ्या महाराष्ट्राला अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचे स्वप्न पडत आहे. ते साकार करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्र्याने पुढाकार घेण्याची गरज आहे. अजितदादांनी झटपट निर्णय घेण्याच्या बाबतीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उगीच कुणाला खुश करायचे म्हणून अजितदादा बोलत नाहीत. ते जे बोलतात त्यात सत्य असते. मग ते कठोर का असेना, ते बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. ते कधीही कोणाला आमिष दाखवीत नाहीत किंवा थापाही मारीत नाहीत, असे श्री. पिचड म्हणाले. त्यांचे आश्वासन हवेत विरत नाही. पूर्ण होतेच, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. एखादा मंत्री लोकांची कामे लवकर करीत असेल, तर याला दोष म्हणायचे काय? अजित पवार यांच्यावर गेल्या काही दिवसांत जे आरोप झालेत ते खोटे आहेत, असेही पिचड म्हणाले.
शिवसेनेवरही घसरले
सग्यासोयèयांना, मुला-नातवंडांना सांभाळून घ्या, अशी भाषा शरद पवार यांनी कधीच केली नाही, असे सांगत पिचड यांनी बाळासाहेबांवरही निशाणा साधला. शरद पवार यांचे नेतृत्व दूरदृष्टीचे आहे. २०१४ हे राष्ट्रवादीचेच असणार, असेही त्यांनी ठासून सांगितले.  प्रताप पाटील चिखलीकर यांना फक्त लोहा-कंधारच नव्हे, तर नांदेडमधील सर्व सोळा तालुक्यांची जबाबदारी पार पाडायची आहे. त्यांना ताकद देण्याचे आमचे कर्तव्य पार पाडू, असे ते म्हणाले.

औरंगाबाद मनपा बरखास्त करा!; विखेंचा विखार

Written By Aurangabadlive on शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२ | १०:०८ PM

प्रतिनिधी
औरंगाबाद :  जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीवरून प. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगलाच वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वादात आता प. महाराष्ट्रातील नेतेही वादग्रस्त विधाने करू लागले आहेत.  मृत साठ्यातील पाण्याचे नियोजन करण्यात औरंगाबाद महानगरपालिका अयशस्वी ठरली आहे. शहराला होणाèया पाणी पुरवठ्यातील सुमारे ४५ टक्के गळती थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. या परिस्थितीला महानगर पालिकाच जबाबदार असून औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणीच कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत बोलताना केली आहे.
पत्रकारांनी जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणामधून पाणी सोडण्याबाबत होत असलेल्या मागणीबाबत विखे यांना विचारणा केली असता  हा विखार बाहेर आला.  ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी देण्याबाबत आमचा विरोध नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे अडीच टी.एम.सी. पाणी नगर जिल्ह्यातून सोडलेसुद्धा. पाणी ही राष्टड्ढीय संपत्ती आहे. मात्र, मराठवाड्यातील काही मंत्री या प्रश्नावरून अकारण राजकारण करीत असून त्यांनी वास्तव समजून घेतले पाहिजे. सध्या जायकवाडी धरणाच्या मृत साठ्यात २६ टीएमसी पाणी आहे. त्याचा वापर योग्य पद्धतीने केल्यास आठ महिने पाणी पुरेल. परंतु, औरंगाबाद महानगरपालिका त्याबाबत कुचकामी ठरली आहे. जायकवाडीमधून औरंगाबादला पाणी वाहून नेणाèया जलवाहिन्यांमधून ४५ टक्के पाण्याची गळती होते. ही गळती रोखण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मराठवाडा अथवा औरंगाबादमधील जमतेला पाणी देण्यास आमचा विरोध कधीही नाही, असेही त्यांनी सांगिले.

कैलासनगर विकासासाठी 20 लाखांचा निधी

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२ | १२:०५ PM

खासदार खैरेंची घोषणा
प्रतिनिधी
औरंगाबाद : कैलास नगर वॉर्ड क्र. 58 मध्ये पाणी व ड्रेनेज लाईन, रस्ता विकास कामाचे उद्‌घाटन शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. कैलासनगर विकासासाठी आपल्या खासदार निधीतून 20 लाखाचा निधी देणार असल्याची घोषणा यावेळी खा. खैरे यांनी केली. खा. चंद्रकांत खैरे यांच्या प्रयत्नाने महापालिकेत पुन्हा युतीची सत्ता आल्याबद्दल काजू मिठाईची तुला कैलासनगरचे नगरसेवक आगाखान याच्यातर्फे करण्यात आली. यावेळी महापौर कला ओझा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौर कला ओझा म्हणाल्या की, रस्ता रुंदीकरणात योगदान दिलेल्या नागरिकांवर अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेणार असून, स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरेसवक आगा खान, नरेश भालेराव, गणेश अंबिलवादे, रोहिद उदावंत, मोबीन भाई, सुरेश गुंजाळ, रोहित श्रीवास्तव, बबलू कदम, छाया भालेराव, जंगमबाई वडम, अलका वडमोरे, लता इंगळे, जयश्री कोठाळे, अशोक भालेराव, अमोल भालेराव, हाफीसा शेख, उषा बनकर, अनिकेत राठोड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कला ओझा औरंगाबादच्या नव्या महापौर

Written By Aurangabadlive on सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२ | १:५७ PM

संजय जोशी उपमहापौर
प्रतिनिधी
औरंगाबाद : युती आणि आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या औरंगाबाद मनपा महापौर, उपमहापौर निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पुन्हा शिवसेनेने महापौर पदावर यश मिळवले असून, सेनेच्या कला ओझा या महापौर झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे संजय जोशी उपमहापौर म्हणून निवडून आले.
मनपाच्या कै. प्रबोधनकार ठाकरे सभागृहात दुपारी बारानंतर दोन्ही पदांसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात कला ओझा यांच्या रुपाने शहराला १९ व्या महपौर मिळाल्या आहेत.  त्या आठव्या महिला महापौर ठरल्या आहेत. यापूर्वी सात महिला महापौर राहिल्या आहेत. शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष, अशी थेट लढत दोन्ही पदांसाठी झाली. महापौरपदासाठी ६, उपमहापौरपदासाठी १२ अर्ज आले होते. त्यात ५८ मते घेऊन आघाडीच्या फिरदोस फातिमा यांचा कला ओझा यांनी पराभव केला.   फातिमा यांना ४० मते मिळाली. कालपर्यंत आघाडीकडून कविता जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. ऐनवेळी आघाडीने फातिमा यांना उमेदवार जाहीर केल्याने आघाडीला पराभव पत्कारावा लागला, अशी चर्चा आहे. उपमहापौरपदी निवड झालेल्या भाजपच्या संजय जोशी यांना ५६ मते मिळाली. त्यांनी भाजपचे निलंबित सदस्य राजू शिंदे यांचा पराभव केला. राजू शिंदे यांना ४३ मते मिळाली.  नगरसेवकांची पळवापळवी, राजकीय कुरघोड्या, गटबाजी आदीमुळे ही निवडणूक गाजली होती.  शिवसेना- भाजपाला नगरसेवकांची मोट बांधता-बांधता नाकीनऊ आले होते.  मनपात काँग्रेसचे १९, राष्ट्रवादीचे ११, असे ३० सदस्य आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक शहरातच मुक्कामी होते, तर सहलीवर असलेले शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष नगरसेवक पहाटे शहरात परतले.  युतीकडून सहा जणांना दिल्ली, अजमेरला पाठवण्यात आले होते. तेही पहाटे दाखल झाले. उपमहापौरपदी हमखास विजयाची खात्री पटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप निलंबित राजू शिंदे यांना थेट ‘रेड कार्पेड’ अंथरले. रात्री उशिरा सिंचन भवन येथे तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाबरोबरच उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
शहरवासियांचा विश्वास सार्थ ठरवू
महिला आघाडीच्या सामान्य कार्यकर्तीला शहराची महापौर बनण्याचा मान केवळ शिवसेनेमुळे मिळाला असून, शहराचा विकास साधून जनतेच्या विश्वास पात्र ठरण्याचा प्रयत्न मी करेल, अशी प्रतिक्रिया निवड झाल्यानंतर कला ओझा यांनी औरंगाबाद न्यूज लाइव्हशी बोलताना दिली.
महापौरपदासाठी आलेले अर्जकला ओझा (शिवसेना), कीर्ती शिंदे (अपक्ष), नीला जगताप (राष्ट्रवादी), फिरदोस फातेमा (काँग्रेस), कविता जाधव (काँग्रेस)
उपमहापौरपदासाठी केलेले अर्ज
शहानवाज खान (अपक्ष), अब्दुल रऊफ खान महेबूब खान ऊर्फ खलील खान (राष्ट्रवादी), प्रमोद राठोड (काँग्रेस), कृष्णा बनकर (अपक्ष), कैलास गायकवाड (अपक्ष), शेख असद पटेल (काँग्रेस), राजू शिंदे (अपक्ष), संजय जोशी (भाजप), मधुकर सावंत (अपक्ष), ख्वाजा शरफोद्दीन (राष्ट्रवादी) अणि परवीन कैसर खान (राष्ट्रवादी).
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.