प्रतिनिधी
औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणासाठी वरील धरणांतून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि आनंद गीते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; तथापि आज प्रत्यक्ष मोर्चा निघाला तेव्हा या मोर्चाचे नेतृत्व सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी केले. विशेष म्हणजे कालच खा. चंद्रकांत खैरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी दिवाकर रावते येणार नाहीत, असे ठामपणे सांगितले होते. पाणीप्रश्नावर यापूर्वीही शिवसेनेतील मतभेद व दु‘ळी बाहेर आलेली आहे.
पाणीप्रश्नावरून धडाकेबाज आंदोलन करायला निघालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना दि. ५ रोजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या रोषाला बळी पडावे लागले होते. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीवर दानवे यांनी मोर्चा काढला होता. मात्र, राडा होण्याची शक्यता लक्षात आल्याने खा. खैरे यांनी थोरात यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वः निभावली. यासाठी त्यांनी दानवे यांच्याशी हुज्जत घातली. या गोंधळात दानवे जखमी झाले होते. या पाश्र्वभूमीवर जायकवाडी धरणासाठी वरील धरणांतून पाणी सोडण्यात यावे, शेतमालाला योग्य भाव मिळावा, मराठवाड्यात दुष्काळ
जाहीर करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आज शिवसेनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता निघणारा नियोजित मोर्चा बारा साडे बारा वाजेच्या सुमारास मोर्चा क्रांती चौक येथून निघून विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला. या मोर्चाची माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट आदी उपस्थित होते; पण पत्रकारांशी ‘क्त खा. चंद्रकांत खैरे हेच बोलले. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि आनंद गीते हे करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले होते. दिवाकर रावते या मोर्चासाठी येणार नाहीत का, असे विचारण्यात आले तेव्हा खैरे यांनी ठामपणे नकारार्थी उत्तर दिले होते. पण आज जेव्हा प्रत्यक्षात मोर्चा निघाला तेव्हा त्याचे नेतृत्व दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांनी केल्याचे दिसून आले. मराठवाड्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आल्याने शिवसेनेचा आजचा मोर्चा जोरदार झाला. पण मोर्चाची चर्चा होण्याऐवजी सध्या शिवसेनेतील शितयुद्धाचीच अधिक चर्चा होताना दिसते आहे. या मोर्चात खा. चंद्रकांत खैरे, परभणीचे खासदार गणेशराव दुधगावकर, माजी. मंत्री अर्जुन खोतकर, जयप्रकाश मुंदडा, महापौर कला ओझा, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, शिवसेना उपनेते लक्षणराव वडले, शिवसेना सचिव अनिल देसाई, आ. आर. एम. वाणी, आ. प्रदीप जैस्वाल, आ. मीरा रेंगे, आ. संतोष सांबरे, आ. बंडू जाधव, आ. किसनचंद तनवाणी, आ. संजय शिरसाट, आ. ज्ञानराज चौगुले, आ. ओमराजे qनबाळकर यांच्यासह अनेक माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.