आठ तासांच्या नोकरीऐवजी ११ -११ तास काम करण्याची अनेकांना हौस असते. कधी गरजेमुळे तर कधी ओव्हर टाईमच्या हव्यासापायी ११ तास काम केले जाते. पण असे काम करणे हृदयासाठी नुकसानकारक असून, त्यामुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता वाढते, असा इशारा ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी दिला आहे. एनल्स ऑफ इंटरनॅशनल मेडिसीन मॅगेझिनमध्ये प्रसिद्ध लेखात या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे, की दीर्घकाळ काम करणाèयांना हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता ६७ टक्क्यांनी वाढते. संशोधनासाठी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या संशोधकांनी ७ हजार नोकरदारांचा अभ्यास केला. ११ वर्षांच्या या संशोधनात ८ तासांहून अधिक काम करणाèया १९२ लोकांना हार्ट अॅॅटॅक आला होता. कोणताही रूग्ण हृदयाची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्यास डॉक्टरांनी त्याला आधी किती काळ काम करता, हे विचारले पाहिजे, असे संशोधकांनी म्हटले आहे. केवळ खाण-पान आणि व्यायामामुळेच आरोग्य चांगले राहते असे नाही तर कामकाजही आरोग्यावर परिणाम करते, असे ते म्हणाले.