लठ्ठ महिला सौंदर्याच्या बाबतीत सडपातळ महिलांची बरोबरी करत नसल्या तरी हुशारीच्या बाबतीत मात्र त्या सरस आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात समोर आले आहे, की लठ्ठपणा महिलांना अधिक हुशार बनवतो. सामान्य महिलांच्या तुलनेत त्या जास्त हुशार असतात. मेंदूतील एक विशिष्ट स्त्राव वाढल्यामुळे महिलांचा मेंदू अधिक प्रभावीरित्या काम करू लागतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. संशोधकांनी सुमारे ४०० महिलांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी महिलांच्या बॉडी मास इंडेक्सच्या आधारावर त्यांची हुशारी तपासली. त्यांचे वजन, उंची, आकार लक्षात घेऊन संशोधकांनी त्यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा दिसून आले की, सामान्य महिलांच्या तुलनेत लठ्ठ महिला यातील जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देऊ शकल्या. त्यांची बुद्धीमत्ता अधिक तीव्र होती. तसेच निर्णय घेण्याची क्षमताही त्यांच्यात जास्त होती. त्यामुळे सौंदर्य नसले तरी लठ्ठ महिलांना डोके आहे, असे आता यापुढे म्हणावे लागेल. त्यामुळे केवळ हुशार आहे म्हणून लठ्ठ महिलांशी लग्न करण्याचा निर्णय भविष्यात पुरूष घेऊ लागलेत तर नवल वाटायला नको.