दिवाळीची सुटी लागून चार- पाच दिवस झालेत. बहुतांश चिमुकली कंपनी आता आपल्या आत्या-मामा-मावशींच्या घरी आलेली असेल. दिवाळीची तयारी तशी झालेली असेलच. घरच्यांनी छानसा ड्रेसही घेतला असेल. कुणी दबंगचा सलमान तर कुणी अनारकलीचा ड्रेस घालून मटकत फिरत असेल. दिवाळीची सुटी म्हणजे तशी फारशी नाहीच, मिळून मिळून ती मिळते किती तर १५ ते १६ दिवस. शहरातल्या शाळांनी तर त्याही बाबतीत काचकूच करत दहा ते १२ दिवसांवर सुटी आणली. काही का असेना, पण लागोपाठ इतकी मोठी सुटी दिवाळीत मिळते हेही नसे थोडके नाही का? चिमुकल्यांनो, दिवाळीत काय काय प्लॅqनग केलं, जरा सांगाल का नाही. फटाके घेतले असतील, ते संपविण्याचे वेधही लागलेले असतील. पण फटाके फोडण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, फटाके फोडण्याचा आनंद हा कायम टिकला पाहिजेत. उगीच फटाक्यांमुळे हात-पाय भाजला तर आनंदाचा बेरंग होईल बरं का. मग काय अख्खी दिवाळी दुःखात जाईल आपली. त्यामुळे फटाके फोडताना जपून फोडा. शक्यतो लहानांनी लहानच फटाके फोडा. मोठा फोडायला आपण थोडेच मोठे आहोत नाही का? जो मोठा तो मोठे फटाके फोडेल आपण लहान म्हणून लहान फटाका. तरीही इच्छा झालीच तर घरच्यांना मात्र बरोबर घ्यायला विसरू नका. दादा, काका, पप्पा, मम्मी कुणालाही सांगा, त्यांना घेऊन हे फटाके फोडण्याचा अट्टाहास धरा. आजकाल काय बाजारात चिनी फटाके आलेत म्हणे. आकर्षक रोषणाई भलेही त्यामुळे होत असेल, पण ती आपल्या काय कामाची... म्हणजे सुरक्षितता नको का? या चिनी फटाक्यांमुळे जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे तसल्या फटाक्यांच्या नादी तुम्ही लागूच नका. फटाक्यांच्या नादात घरात काय गोडधोड केलंय, त्याचं विचारायचं राहिलंच की, अनारसे, लाडू, शंकरपाळे, करंज्या, चकल्या बरंच काही केलं असेल ना? त्यावर दिवसातून एक- दोनदा तावही मारत असाल. आई लाडू देत नाही म्हणून गळा काढणंही झालं असेल. पण असे पदार्थ वारंवार आणि अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होतं हे तुम्हाला माहीत आहे की नाही? माहित नसेल तर मी सांगतो ना. जास्त प्रमाणात तेलकट, तुपट पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. आरोग्य बिघडल्यावर मग डॉक्टरांकडे जावं लागतं. मग डॉक्टही सूई दिल्याशिवाय थोडेच सोडणार आहे ? सुई नको असेल तर आजपासून पूर्ण दिवाळी होईपर्यंत हे पदार्थ दिवसातून फक्त एकाच अन् आई देईत तेवढेच खायचे हे लक्षात ठेवा... अरेच्चा अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीच, दिवाळी आहे म्हणजे शिक्षकांनी दिलेला होमवर्कला विसरू नका म्हणजे झालं. दिवाळीचे पाच दिवस सोडले अन् या पाच दिवसांच्या समोरचा अन् मागचा एक एक दिवस सोडला तर बाकीचे दिवस होमवर्कवरही लक्ष असू द्यावे. अन्यथा मजाची सजा भेटायला १६ वा दिवस आहेच, हे ध्यानात ठेवा.
सण म्हणजे आनंदाचा पण गोंगाटाचा नाही हेही लक्षात घ्या. त्यामुळे घरात गोंधळ नको. मामेभाऊ आला, आत्येबहीण आली म्हणून उगीच सगळ्यांनी मिळून घरात qधगाणा घालणं बरं नाही. त्याऐवजी अंगणात खेळा. घरापासून जास्त दूरही खेळू नका. आपल्या घरच्यांचं आपल्यावर लक्ष राहील, इतके दूर खेळू शकता. खेळताना शरीर जपूनच खेळा. उगीच शरीराला इजा होईल असे खेळ नको. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राची संस्कृती आदरातिथ्याची आहे. आदरतिथ्य काय आहे माहीत आहे ना? घरी आलेल्या पाहुण्यांना योग्य तो मान- सन्मान देणे. आपणही घराचे महत्त्वाचे सदस्य. त्यामुळे ही गोष्ट आपणही जपायला हवी. घरी कुणी पाहुणे आले की, सर्वांत आधी त्यांना प्यायला पाणी नेऊन द्या. मग आई सांगेल तर फराळाचंही नेऊन द्या. मोठे नातेवाईक आले असतील तर ते आल्या आल्या त्यांचे दर्शन घ्या. एवढं केलं ना तर तुम्ही गुड बॉय qकवा गुड गर्ल आहे, हे तुम्ही सांगण्याची गरजच राहणार नाही. आपोआपच तुम्हाला सगळे तसं म्हणतील. मग यंदाच्या दिवाळीत असं वागायचं ना... वागून तर पहा, मग बघा तुमचे मम्मी- पप्पा तुमच्यावर किती खुश होताहेत ते....