प्रतिनिधी
औरंगाबाद : कारच्या सिटवर ठेवलेले १० लाख २५ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बाबा पेटड्ढोलपंप ते मध्यवर्ती बसस्थानकादरम्यान घडली. लक्ष्मीपूजनासाठी पुणे येथे नेण्यासाठी बँकेच्या लॉकरमधून हे पैसे काढलेले होते.
समर्थनगर येथील श्री अपार्टमेंट येथे राहणारे आनंद सदाशिव पुराणिक यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले ३४० ग्रॅमचे सोन्याचे आणि १० ग्रॅमचे चांदीचे दागिने काढले. हे सर्व दागिने एका काळ्या रंगाच्या पिशवीत ठेवून ती पिशवी त्यांनी त्यांच्या अल्टो कारच्या (क्र. एमएच-२० एजी ३४७२ ) सीटवर ठेवली. बाबा पेटड्ढोलपंप येथे त्यांनी कारमध्ये पेटड्ढोल भरले. त्यांना पुणे येथे हे दागिने घेऊन जायचे असल्याने ते कार घेऊन मध्यवर्ती बसस्थानकावर गेले. तेथे पोहचल्यानंतर कारच्या सीटवर दागिन्याची पिशवी त्यांना दिसली नाही. त्यावेळी त्यांनी संपूर्ण कारची झडती घेतली असता, पिशवी सापडली नाही. लक्ष्मीपूजनासाठी बँकेच्या लॉकरमधून काढलेले दागिने चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्रांतीचौक पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी पुराणिक यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.