औरंगाबाद : दोन गटांत हाणामारी होऊन दोन जण जखमी झाले. ही घटना नेवपूर (ता. कन्नड) येथे घडली. परस्परविरोधी तक्रारींवरून पंधरा जणांवर पिशोर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
नेवपूर येथील रंगनाथ सयाजी कोतकर (७०) यांचा भाऊ साळूबा इनामी जमिनीच्या कारणावरून कोणाला तरी शिवीगाळ करीत असताना दीपक दिलीप कोतकर, संदीप कोतकर, किशोर कोतकर, कचरू कोतकर, नामदेव कोतकर, देवानंद सुखदेव कोतकर, गजानन कोतकर यांनी रंगनाथ कोतकर यांच्या भावास मारहाण सुरू केली. रंगनाथ हे सोडविण्यास गेले असता त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत रंगनाथ कोतकर यांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नामदेव कचरू कोतकर (३८) यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या चुलत भावजयीने समाजाच्या पंचायतीच्या पैशातून टेम्पो विकत घेतला, असे साळूबा कोतकर यास म्हणाली म्हणून साळूबा यांच्यासह हिरामण कोतकर, विजय कोतकर, राजेंद्र कोतकर, रवींद्र कोतकर, सविता कोतकर, ज्योती कोतकर, साधना कोतकर यांनी नामदेव कोतकर यांच्या भावजयीस शिवीगाळ केली.