प्रतिनिधीऔरंगाबाद : नवरा सोडून ती प्रियकरासोबत राहत होती. पण त्याचे जेव्हा तिच्यावर मन भरले तेव्हा त्याने तिला छळ सुरू केला. शेवटी या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली. आधी नवèयाला सोडले, पण प्रियकराने दगा दिल्याने तिला जगही सोडावे लागले. ही घटना रांजणगाव येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मनिषा भगुरे (२४, रा. रांजणगाव) ही नवèयासोबत पटत नसल्याने आई-वडिलांकडे नारेगाव येथे एक वर्षापासून राहत होती. या काळात तिचे सुनील ऊर्फ सुमित रामकृष्ण कड (३२, रा. नारेगाव) याच्याशी सूत जुळले होते. १५ एप्रिल रोजी मनीषा ही सुमितबरोबर पळून गेली होती. तेव्हापासून ती सुमितबरोबर रांजणगाव येथे राहण्यासाठी गेली होती. काही दिवस दोघे नवरा-बायकोसारखे राहिल्यानंतर सुनिलमध्ये अचानक बदल झाला. तो तिला बेदम मारहाण करू लागला. सातत्याने होणाèया त्रासाला कंटाळून मनीषाने ९ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.