उचिताचा काळ, साधावया युक्तीबळ
आपले सकळ, ते प्रसंगी पाहिजे
नेम नाही लाभ हानि, अवचित घडती दोनी
विचारुनि मनी, पाहिजे ते प्रयोजावे
जाळा जाळा काळे, करपो नेदावे आगळे
जेविता वेगळे, ज्याचे त्याचे तेथे शोभे
पाळी नांगर पाभारी, तरी निवडूनि सोकरी
तुका म्हणे धरी, सेज जमा सेवर्टी
- संत तुकाराम
चालून आलेल्या संधीचा फायदा करून घेण्यासाठी आपल्याजवळ ती हुशारी असली पाहिजेत. त्यासाठी बुद्धीची तत्परताही असली पाहिजेत. कारण फायदा आणि नुकसान कोणत्या वेळेस होईल हे सांगता येत नाही. ते अचानक होतात म्हणून त्याबाबतीत विचार करून ज्या वेळेस जे आवश्यक असतं, त्या वेळेस ते केलंच पाहिजे. जसं भाजी भिजवायला जाळ तर लावलाच पाहिजेत. पण त्याबरोबर जाळ जास्त वेळ लागून भाजी करपणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. जिथलं काम तिथंच शोभतं. जसं जमीन नांगरून पाळ्या घालाव्या व नंतर तिथं पेरणी करावी. एवढंच नाही तर ते धान्य उगवल्यानंतर त्यातलं गवत काढून पिकाचं राखण करावं आणि शेवटी वेळच्या वेळी काळजी घेऊन वाढलेल्या पिकाचं धान्य जमा करून घरी नेऊन साठवून ठेवावं.आपले सकळ, ते प्रसंगी पाहिजे
नेम नाही लाभ हानि, अवचित घडती दोनी
विचारुनि मनी, पाहिजे ते प्रयोजावे
जाळा जाळा काळे, करपो नेदावे आगळे
जेविता वेगळे, ज्याचे त्याचे तेथे शोभे
पाळी नांगर पाभारी, तरी निवडूनि सोकरी
तुका म्हणे धरी, सेज जमा सेवर्टी
- संत तुकाराम
तात्पर्य : कोणतंही काम करताना आळस झटकून योग्य वेळेत ते काम करावं. चालून आलेली संधी आपल्या हुशारीनं ओळखून तिचा पुरेपूर फायदा करून घ्यावा
- विजय गवळी