प्रतिनिधी
औरंगाबाद : येथील मुख्य बसस्थानकानजिक एक मोटरसायकलस्वार बसखाली चिरडून ठार झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.
आनंद अशोकराव बिडवे (२२) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. आनंद हा रेल्वेस्टेशन परिसरातील शासकीय मुद्रणालयात नोकरीला होता. तो मोटरसायकलवरून (एमएच २०-सीएल ३३५६) भरधाव वेगाने आपल्या कार्यालयाकडे निघाला होता. बसस्थानकानजिकच्या एका वळणावर बस वळत असताना पाठीमागून मोटरसायकलवर भरधाव वेगाने आलेल्या आनंद बिडवे यास मोटरसायलवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो घसरून मोटरसायकलसह बसखाली (एमएच २०- डीएल ०६०२) गेला. बसखाली चिरडल्या गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नितीन आंधळे यांच्या फिर्यादीवरुन बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सातोदकर करीत आहेत.