औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी ड्यूएल डेस्क खरेदीचा प्रस्ताव मंजुर केला. परंतु ग्रीन बोर्ड खरेदीवर मनसेचे सभापती अजूनही ठाम राहिलेले असून राजकारणाची दुप्पटी समोर आली आहे.
विद्याथ्र्यांना शाळेत ड्यूएल डेस्क ऐवजी ग्रीन बोर्डची आवश्यकता असल्याचा मुद्दा मनसेने सर्वसाधारण सभेत मांंडला. यावर सत्ताधारी सदस्यांनी विरोध दर्शवित डयुएल डेस्क खरेदी करण्यावर जोर कायम ठेवला आहे. ४५ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा अध्यक्षा नाहिदा बानो पठाण यांनी गोंधळात मंजुर करून घेतला. परंतु शिक्षण समितीच्या बैठकीत ग्रीन बोर्ड खरेदीचा प्रस्ताव मंजुर असताना तो मान्य न केल्याने शिक्षण सभापती व बांधकाम सभापतींनी सभागृह सोडले. दरम्यान, आज शिक्षण समितीचे सभापती बबन कुंडारे यांनी खुलासा करताना मनसे अजूनही ग्रीन बोर्ड खरेदीवर ठाम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळेत आज ड्यूएल डेस्कची गरज नसून ग्रीन बोर्डची आवश्यक आहे. त्यामुळे अध्यक्षांनी मंजुर केलेल्या प्रस्तावाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे जिल्हा परिषद अध्यक्षांनी ड्यूएल डेस्क खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असुन दूसरीकडे मनसे यास विरोध दर्शवित आहे. अशा सत्ताधारी-विरोधी पक्षांमध्ये धुसमस सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.