आजी-माजी मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना आव्हान!
प्रतिनिधी
नांदेड : माणिकराव ठाकरे काय बोलत आहेत, हे त्यांनाच कळेनासे झाले असून, महापालिका निवडणुकीत प्रचारावेळी त्यांनी स्वबळाची भाषा केली. qहमत असेल तर त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवावीच. याची सुरुवात नांदेडपासून करावी, असे आव्हान देत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी स्वबळावर लढण्याचा पुन्हा एकदा नारा दिला. त्यांच्या या जाहीर वक्तव्याने आघाडातील भांडण पुन्हा चव्हाट्यावर आणले आहे. अजित पवार यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी करून राष्ट्रवादीच्या भविष्यातील भूमिकेचे संकेत दिले.
लोहा (जि. नांदेड) येथे प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज, मंगळवारी (दि. ६) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी बोलताना पिचड यांनी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. पिचड म्हणाले, की सध्याच्या राजकारणात सर्वांत जास्त भ्रष्टाचारी कोण? याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर जे चित्र समोर येईल, ते निश्चितच आश्चर्यजनक असेल. आता अवघ्या महाराष्ट्राला अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचे स्वप्न पडत आहे. ते साकार करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्र्याने पुढाकार घेण्याची गरज आहे. अजितदादांनी झटपट निर्णय घेण्याच्या बाबतीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उगीच कुणाला खुश करायचे म्हणून अजितदादा बोलत नाहीत. ते जे बोलतात त्यात सत्य असते. मग ते कठोर का असेना, ते बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. ते कधीही कोणाला आमिष दाखवीत नाहीत किंवा थापाही मारीत नाहीत, असे श्री. पिचड म्हणाले. त्यांचे आश्वासन हवेत विरत नाही. पूर्ण होतेच, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. एखादा मंत्री लोकांची कामे लवकर करीत असेल, तर याला दोष म्हणायचे काय? अजित पवार यांच्यावर गेल्या काही दिवसांत जे आरोप झालेत ते खोटे आहेत, असेही पिचड म्हणाले.
शिवसेनेवरही घसरले
सग्यासोयèयांना, मुला-नातवंडांना सांभाळून घ्या, अशी भाषा शरद पवार यांनी कधीच केली नाही, असे सांगत पिचड यांनी बाळासाहेबांवरही निशाणा साधला. शरद पवार यांचे नेतृत्व दूरदृष्टीचे आहे. २०१४ हे राष्ट्रवादीचेच असणार, असेही त्यांनी ठासून सांगितले. प्रताप पाटील चिखलीकर यांना फक्त लोहा-कंधारच नव्हे, तर नांदेडमधील सर्व सोळा तालुक्यांची जबाबदारी पार पाडायची आहे. त्यांना ताकद देण्याचे आमचे कर्तव्य पार पाडू, असे ते म्हणाले.