औरंगाबाद : भरधाव टेम्पोने एस-टी बसला उजव्या बाजूने जोराची धडक दिली. हा अपघात अब्दीमंडी जवळ घडला असून या अपघातात 10 प्रवासी जखमी झालेआहेत. या प्रकरणी टेम्पो चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर-औरंगाबाद ही बस (एम.एच.20-बी.एल.1394) प्रवाशांना घेऊन औरंगाबादकडे येत होती. दौलताबाद जवळ असलेल्या अब्दीमंडी गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या टेम्पो चालकाने बसला हुलकावणी देत बसच्या उजव्या बाजूला जोराची धडक दिली. घडलेल्या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले. पुंडलिक फकीरा शिरसाठ, इंदुमती पुंडलीक शिरसाठ (रा. भावसिंगपुरा), अमोल गोपाळराव जाधव, संजय भानुदास चव्हाण, शब्बीर शहा, पोपट गंगाराम लाहोट, धनश्री कुलाल बिलोलीकर, कोकिळा कन्हैय्या बिलोलीकर, दिलीप बारकू पाटील, मुरलीधर बागूल असे त्यांची नावे असून जखमींवर घाटी रूग्नालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार निसर्गन हे करीत आहेत.