प्रतिनिधी
औरंगाबाद : जिल्हा विकास व नियोजन समितीच्या बैठकीसाठी औरंगाबादेत आलेल्या पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना तहानलेले राहण्याची वेळ आज शिवसैनिकांमुळे येत होती. शिवसेनेच्या कार्यकत्र्यांनी थेट पालकमंत्र्यांना घेराव घातला आणि मराठवाड्याचे पाणी नगर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना पिऊ देऊ नका, असा दम भरला. या वेळी पोलिस आणि काँग्रेस कार्यकत्र्यांशी झालेल्या झटापटीत शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे जखमी झाले आहेत. त्यामुळे आजच्या (सोमवार) जिल्हा विकास व नियोजन समितीच्या बैठकीचा चांगलाच बेरंग झाला...
जायकवाडीत नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या कार्यकत्र्यांनी थोरात यांना घेराव घालण्याचा इशारा यापूर्वी दिला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी बंदोबस्तही ठेवला होता. थोरात या बैठकीसाठी दुपारी तीनला जिल्हाधिकारी कार्यालयातील समितीच्या सभागृहासमोर आले. त्याच वेळी शिवसेनेच्या कार्यकत्र्यांनी त्यांना घेराव घातला. जायकवाडीत नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी करत त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. शिवसेनेचे कार्यकर्ते थोरात यांच्या जवळ पोहचू लागल्याने पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यात काही काँग्रेस कार्यकत्र्यांनी थोरात यांना सुरक्षेत आणण्यासाठी धाव घेतली. त्यांनी शिवसैनिकांना लोटपोट केल्याने चांगलीच झटापट झाली. त्यात अंबादास दानवे जखमी झाले. पोलिसांनी शांततेने हे प्रकरण हाताळत, शिवसेना पदाधिकाèयांना समजूत घातली. त्यानंतर जिल्हा विकास आणि नियोजन समितीच्या बैठकीत पाणी सोडण्यासंदर्भातील निवेदन थोरात यांना देण्यात आले. याच वेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकत्र्यांनी थोरात यांना मराठवाड्याचे पाणीही पिऊ देणार नाही. त्यांनी नगर जिल्ह्यातूनच पिण्याचे पाणी आणावे, असा दम भरला. ९ नोव्हेंबर रोजी पाणी प्रश्नावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला. मोर्चाची दखल घेऊन राज्य शासनाने काही पावले उचलले नाही तर मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर उग्र स्वरुपाचे आंदोलन करू, असेही त्यांनी बजावले.