प्रतिनिधी
औरंगाबाद : झाडाला आंबे लगडायला सुरुवात होते ती उन्हाळ्यात. फार फार बहार फुटायला हिवाळ्यात सुरुवात होते. पण औरंगाबादेत विपरितच घडले आहे. हिवाळ्यातच एका झाडाला आंबे लगडले असून, एक, दोन नव्हे तर तब्बल १५ ते २० आंब्यांच्या गुच्छांनी झाड बहरले आहे. मोसमातील या झाडाचा हा दुसरा बहर असून १५ वर्षांत प्रथमच एका वर्षात दुसèयांदा आंबे लागले आहेत, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली आहे. मराठवाड्यात न आढळणारी ही आंब्याची जात असून हा प्रकार अचंबित करणारा असल्याच ते म्हणाले.
सिडको एन-२ भागात राहणारे व्यावसायिक प्रशांत कुलकर्णी यांच्या अंगणातील झाडाला हे हिवाळ्यात आंबे लागले आहेत. कृषिशास्त्रज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी या झाडाची पाहणी केली. प्रकार पाहून तेही आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की, या झाडावर आता किमान ३०० ते ३५० फळे आहेत. लंगडा, रत्ना, दशेरी अशा परिचित जातींपैकी हा आंबा नाही. शिवाय वर्षातून दोनदा आंबे लागणाèया जातीचेही हे झाड नाही. काही आंब्यांना पावसाळ्यात मोहोर येतो. पण पावसात तो झडून जातो. यंदा पाऊस नसल्याने त्याने फळ धरले असावे. डॉ. कापसे म्हणाले की, गुच्छांनी येणारे आंबे आकाराने कमी-जास्त असतात. पण हा गुच्छ तर १५-२० आंब्यांचा आहेच, शिवाय त्यांचा आकारही जवळपास सारखाच आहे. या दिवसांतील आंबे चवीला तितकेसे चांगले नसतात. पण हा आंबा चटकदार आहे. या आंब्याचे कलम केल्यास ते आर्थिकदृष्ट्या चांगले उत्पादन देऊ शकेल, असेही ते म्हणाले.