प्रतिनिधी
औरंगाबाद : भाडेकरूंमधील वाद सोडवल्याच्या कारणावरून राहुल रोडगे (२२, रा. फुलेनगर, पंढरपूर) याच्यावर चौघांनी चाकूहल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चाकूहल्ला करणारे सादिक फकीर, रमजान शेख, अलीम व अन्य एक आरोपी फरार आहेत. पंढरपूरमधील शंकर खोतकर व आरोपी सादिक फकीर यांच्या भाडेकरूंमध्ये काही दिवसांपूर्वी वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी राहुलने मध्यस्थी केली. त्यामुळे त्यांच्यातील वाद थांबला. त्यानंतर एके दिवशी तिरंगा चौकात चौघांची राहुलशी भेट झाली. तेव्हा तू भांडण का सोडवले? असे म्हणत सादिकने राहुलवर चाकूहल्ला केला. अलीमने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्याच्यासोबतच्या इतर दोघांनीही राहुलला बेदम मारहाण केली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक एन. आर. वाघ पुढील तपास करत आहेत.