प्रतिनिधी
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील एका विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वडोदबाजार पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा नोंद केला आहे. आरोपींना फुलंब्री न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
उमरावती येथील रेणुका तुकाराम काटकर हिने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी विवाहितेचे वडील सखाराम पल्हाळ (रा. तासेगाव, ता. गंगापूर) यांनी वडोदबाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासरची मंडळी रेणुकाला नवीन टड्ढॅक्टर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन ये, तसेच मूलबाळ होत नसल्याने नेहमी वांझोटी, असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ करत होते. त्यामुळे तिने आत्महत्या केली. या रेणुकाच्या आत्महत्येस सासरची मंडळीच जबाबदार आहे, असे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार रेणुकाच्या वडिलाने दिलेल्या फिर्यादीवरून पती तुकाराम काटकर, सासरा आनंदा काटकर, सासू लक्ष्मीबाई, दीर रावसाहेब काटकर, रतन काटकर, अशोक काटकर, संतोष काटकर यांच्यासह अन्य पाच जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना फुलंब्री न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.