जुळ्या मुलींना जन्म देणाèया मातेला गौरवले
प्रतिनिधी
औरंगाबाद : कन्या वाचवा अभियाना अंतर्गत जुळ्या मुलींना जन्म देणाèया मातेचा तालुक्यातील मोढा खुर्द येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
मोढा खुर्द या गावात माया खराटे या महिलेने नुकताच दोन जुळ्या मुलींना जन्म दिला असून (रिद्धी व सिद्धी ऊर्फ जाई-जुई) या प्रसंगाचे औचित्य साधून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी कन्या वाचवा अभियानाच्या अनुषंगाने नाचनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक कुमावत व जि.प.प्रा.शाळा मोढा खुर्दच्या शिक्षिका सरला कामे यांनी या बालिकांच्या आईचे स्वागत केले. तसेच गावातील राधा कल्याणकर, कविता मोरे व सुमय्या शेख या मुलींना जन्म देणाèया महिलांचादेखील सत्कार करण्यात आला. या वेळी रिद्धी-सिद्धी या दोन जुळ्या मुलींच्या वाढदिवसाच्या दिवशी १८ वर्षांपर्यंत ३ हजार रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात येईल, असे आश्वासन अशोक कुमावत व कामे यांनी दिले. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सीमा कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सज्जन टाकसाळे यांनी केले. प्रास्ताविक सरला कामे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयमाला वाघ, संयोगीता खैरनार, मंगला एंडोले, रवींद्र मोरे, इम्रान शेख यांनी परिश्रम घेतले.