प्रतिनिधी
औरंगाबाद : सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने २ डिसेंबर रोजी औरंगाबादेत पहिले सून संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला राज्यभरातून सुना उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात राज्यातील काही सजग सुनांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
तापडिया नाट्य मंदिरात २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या संमेलनाचे उद््घाटन होईल. समारोप सायंकाळी ५ वाजता होईल. दिवसभर चालणाèया या संमेलनात विविध विषयांवर गटचर्चा होईल. समारोप सत्रात प्रातिनिधिक स्वरुपात काही सुना मनोगत व्यक्त करतील. समितीच्या वतीने यापूर्वी २४ जून रोजी राज्यातील पहिले सासू संमेलन घेण्यात आले होते. बदललेली जीवनशैली, अवास्तव अपेक्षा, समजुतीचा अभाव आणि संवाद नसणे, यामुळे कुटुंबांतर्गत ताणतणाव वाढत आहेत. हे ताणतणाव कमी करणे आणि कुटुंबात चांगले वातावरण तयार करणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. या संमेलनाच्या तयारीसाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी चंदाताई जरीवाला, ताराबाई लड्डा, प्राचार्या मनोरमा शर्मा, अनुराधा कांबळे, डॉ. मेबल फर्नांडिस, चंद्रभागाबाई दाणे, सुहासिनी बोरीकर, डॉ. सविता पानट यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समिती कार्यरत आहे.