प्रतिनिधी
औरंगाबाद : यंत्रात हात अडकून कामगाराची चार बोटे तुटल्याची घटना वाळूज एमआयडीसीत घडली. या प्रकरणी कंपनी मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील पुलिंग अँट कंपनीत नवनाथ गायकवाड (३०, रा. वडगाव) हे स्पेअर पार्ट मशीन ऑपरेटर म्हणून आहेत. या मशीनला सुरक्षाकवच लावण्यात आलेले नव्हते. गेल्या २३ ऑक्टोबर रोजी नवनाथ गायकवाड यांचा हात काम करताना या मशीनमध्ये गेला व त्यात त्यांची चार बोटे गेली. त्यांना सुरुवातीला बालाजी हॉस्पिटल व नंतर पटवर्धन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना एमएलसी पाठविली नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा दावा करण्यास उशीर होत होता. शेवटी कारखाना निरीक्षकांच्या अहवालावरून कंपनीचे मालक आर. व्ही. कुलकर्णी यांच्यावर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.