कधीकधी काहीजण असे विनोद करतात की पोट धरून हसायला येतं. नंतर हसून हसून पोट दुखायला लागलं तरी हसू मात्र थांबत नाही. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मानण्यात येणारा कुख्यात दहशतवादी आणि लष्कर-ए- तोयबा संघटनेचा नेता हाफिज मोहम्मद सईद हाही सध्या असेच विनोद करीत सुटला आहे. नुकतेच अमेरिकेला सॅण्डी नावाच्या वादळाने झोडपून काढले. अमेरिकेच्या पूर्व किनाèयावरील शहरे आणि महानगरांची अपरिमित हानी या वादळामुळे झाली. लाखो लोक बेघर झाले. अनेकांना विस्थापित व्हावे लागले. वादळाचा तडाखा बसलेल्या याच अमेरिकन जनतेसाठी सईदने मदतीचा हात पुढे केला. ज्याचे कर्तृत्वच नागरी जीवनाच्या विध्वंसाचे आहे, अशा माणसाने माणुसकीच्या दृष्टीकोनातून संकटात सापडलेल्यांना मदत देऊ करावी, याहून दुसरा मोठा विनोद कोणता असू शकतो? हजारो नागरिकांच्या हत्येचे पाप माथी घेऊन फिरणाèयाने इतरांसाठी मदतीचा हात पुढे करावा, हे हास्यास्पद नाही का? अर्थात, या नरकासुराने देऊ केलेली मदत अमेरिकेने झिडकारली आणि त्याला त्याची जागाही दाखवून दिली. त्याचवेळी अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला दहशतवादी घोषित केले असल्याची जाणीवही करून दिली. आजवर अमेरिकेच्या प्रत्येक धोरणाला, अमेरिकेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाèया, दररोज मोर्चे काढून पाकिस्तानी जनतेला अमेरिकेच्या विरोधात फुस लावणाèया आणि जिहादमध्ये शहीद होण्याच्या वल्गना करणाèया सईदने आपल्या जमात-उद-दावा संघटनेच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीने पीडित असलेल्या अमेरिकेतील वादळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करावा, हा निव्वळ विनोदच नाही तर दुसरे काय असू शकते? एकंदरीत हाफिज सईदच्या या विनोदामुळे तो ऐकणाèयांचे हसून हसून पोट दुखत असतानाच आता त्याने याच्याही पुढे जात आणखी एक विनोद करून विनोदाच्या साèया सीमाच ओलांडल्या आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर झालेल्या हल्ल्याची सईदने चक्क निंदा केली आहे. ज्याला या हल्ल्याचा सूत्रधार मानले जाते, त्या मृत्यूच्या सौदागरानेच या हल्ल्याला ‘भ्याड हल्लाङ्क म्हणणे हा विनोद नाही तर दुसरे काय? दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी लोक याला जिहाद म्हणत असले तरी ते चुकीचे आहे. मी या हल्ल्याची आणि निर्दोष लोकांना ठार मारण्याच्या घटनेची qनदा करतो. अशा प्रकारच्या कुठल्याही हिंसक हल्ल्यांचे मी समर्थन करणार नाही, असे सईदने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सईदची ही वाक्ये म्हणजे बिघडलेल्या विद्याथ्र्याने चांगला अभ्यास करून पहिला क्रमांक मिळवावा, असे व्हावे, अशीच आहेत. मुंबईचे नागरी जीवन व्यवस्थित सुरू असताना पाकिस्तानात व्यवस्थित कट रचून दहा प्रशिक्षित दहशतवाद्यांना येथे पाठवून या शहरावर हल्ला घडवून आणायचा, या दहशतवाद्यांकरवी मोठा विध्वंस घडवून आणायचा, दोनशेच्या वर निष्पाप नागरिकांची हत्या घडवायची, अशी ज्याची कर्तबगारी आहे, त्याच सईदने आज मुंबईवर झालेल्या या आजवरच्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची qनदा करावी काय? सर्वसामान्य माणसाने दोन-तीन चुकीची कृत्ये केली आणि नंतर त्याला जर या कृत्यांचा पश्चाताप झाला, तर आपल्याकडे ‘वरातीमागून घोडंङ्क, असे म्हटले जाते. पण सईदसारख्या मृत्यूच्या सौदागराने केलेले कृत्य आणि याच कृत्याची आज तो करीत असलेली qनदा ही ‘वरातीमागून घोडेङ्क म्हणण्याच्याही पलिकडची आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला येत्या २६ तारखेला चार वर्षे पूर्ण होत आहेत. नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर दुसèयाच महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाने या हल्ल्यातील सईदचा सहभाग स्पष्ट झाल्यामुळे सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेले आहे. त्याची माहिती देणाèयास दहा दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षिस देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. सईद हा केवळ मुंबईवरील हल्ल्याचाच नाही, तर अशा अनेक हल्ल्यांचा सूत्रधार आहे. मुंबईवरील हल्ल्यापासून गेली चार वर्षे भारत सईदवर कारवाई व्हावी, म्हणून पाकिस्तानच्या मागे लागला आहे. त्याच्याविरोधात भरभक्कम पुरावेही पाकच्या हवाली केले. मात्र, पाकने हे सर्व पुरावे नाकारून सईदला दहशतवादी कृत्ये करण्यासाठी मोकाट रान दिले आहे. जगाच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी आरंभीचे सहा महिने सईदला घरातच स्थानबद्ध करून ठेवले होते खरे; पण त्याच्यावर लावलेल्या आरोपासंबंधी भारताने दिलेले पुरावे पाकच्या नापाक सरकारने तेथील न्यायालयापासून दडवून ठेवले अन् त्यामुळे न्यायायलाने त्याच्या अटकेविरोधात निर्णय देऊन त्याची सूटका केली. सईद लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आहे. मात्र, अमेरिकेसह जगाने या संघटनेवर बंदी घातल्यापासून तो जमात-उद-दावा या सेवाभावाचा मुखवटा घातलेल्या संस्थेच्या माध्यमातून दहशतवादी कृत्यांसाठी पैसा गोळा करीत आहे. बंदी घातल्यानंतरही तोयबाने दहशतवादी कृत्ये सुरूच ठेवत मुंबईवर हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारताप्रमाणेच सहा अमेरिकन नागरिकही ठार झाले होते. न्यूयॉकमधील जागतिक व्यापार केंद्राचे जुळे मनोरे पाडण्याचे कारस्थान रचणाèया ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकमध्ये घुसून ठार केले होते. जगाच्या पाठिवर कुठेही अमेरिकन नागरिकांची हत्या झाल्यास, त्या देशात घुसून हे कृत्य करणाèयांना ठार मारण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या सैनिकांना देऊ शकतात. तोच नियम आपल्याही बाबतीत लागू होऊ शकतो, याची भीती आता सईदला वाटत आहे. मुंबईवरील हल्ल्यामागील सूत्रधार पाकिस्तान आणि या देशाने पाळलेले सईदसारखे सापच असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. याच हल्ल्यावेळी पकडला जाऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला कसाब आणि आता अबू जिंदाल भारताच्या हाती लागल्याने भारताच्या सईदवरील आरोपांना धार आली आहे. त्यातून सुटका करून घेण्यासाठी सईदची धडपड सुरू आहे. यातूनच तो कधी संकटात सापडलेल्या अमेरिकन नागरिकांना मदत देऊ करीत आहे तर कधी मुंबईवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत आहे. एखादे कृत्य केल्यानंतर त्याची उपरती होऊन तो व्यक्ती सुधारल्यासारखा वागावा, असे सईदचे व्यक्तिमत्त्व नक्कीच नाही. उलट लादेनच्या खात्म्यानंतर सईदच्या डोक्यावर मृत्यूचे सावट घोंघावत आहे. अमेरिका आपला कधीही खात्मा करू शकते, याची भीती त्याला वाटत असावी. त्यातूनच तो मुंबईवरील हल्ल्याची निंदा करण्याचे शहाजोग नाटक करीत आहे, हे स्पष्टच आहे. पण सईदसारख्या मृत्यूच्या सौदागराने आणि रक्तपिपासूने मुंबईवरील हल्ल्याची निंदा करणे म्हणजे सैतानाने बायबल वाचण्यासारखेच आहे.
सैतानाच्या तोंडी बायबल (संपादकीय)
Written By Aurangabadlive on रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२ | १२:१८ PM