कारणापे असता दृष्टी, शंका पोटी उपजेना
शूर मिरवे रणांगणी, मरणीच संतोष
पाहिजे तो कळवळा, मग बळा काय उणे
तुका म्हणे उदारपणे, काय उणे मानावे...
- संत तुकाराम महाराज
आपण एकदा का आपलं ध्येय ठरवून पक्क केलं आणि आपलं सगळं लक्ष त्याच ध्येयाकडे लावलं तर मनात काम पूर्ण होईल की नाही, अशा प्रकारची कोणतीही शंका निर्माण होत नाही. शूर माणूस हा रणांगणात शोभून दिसतो आणि रणांगणावर युद्धात मरण्यात त्याला भूषण वाटते. कोणतंही काम करण्याची खरी इच्छा आणि तळमळ मात्र पाहिजे. असं असल्यावर आपल्याला आपल्या सामथ्र्याचं बळ काय कमी पडणार? अशा कामांना पूर्ण करण्यासाठी जर मन उदार केलं तर काही कमी पडणार नाही.
तात्पर्य : आपलं ध्येय ठरलेलं पाहिजे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे.