प्रतिनिधी
औरंगाबाद : पराकोटीची स्पर्धा आणि मंदीचा तडाखा या दुहेरी संकटांवर मात करण्याचा प्रयत्न उद्योगजगत करते आहे. लघु, लहान आणि मध्यम उद्योगांची तर अस्तित्वासाठी धडपड सुरु आहे. या पोर्शभूमीवर उद्योगक्षेत्राचा कणा असलेल्या सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काम करणाèया प्रत्येक व्यक्तीने नवीन संकल्पना, नवीन विचार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलाच पाहिजे. आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करीत ङ्कक्त व्यावसायिकच नव्हे तर वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि देशाचीही उन्नती, प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल्स मॅनेजमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष जे. एच. पटेल यांनी केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल्स मॅनेजमेंट तर्फे शनिवार, दि. ३ नोव्हेंबर २०१२ रोजी व्यावसायिक धोरणांची पुनर्रचना या विषयावर राष्ट्रीय परिषद .फर्स्ट मॅट सिलेक्टच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे झालेल्या या एकदिवसीय परिषदेमध्ये मटेरियल्स मॅनेजमेंट क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सहा सत्रांत झालेल्या या परिषदेमध्ये देशभरातून खासगी, शासकीय, निमशासकीय क्षेत्रातील इंजिनिअरिंग, ऑटो, कार्मा, स्टील, सीड, इलेक्ट्रॉनिक्स, हॉस्पिटल्स आदींमधील मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये काम करणारे अधिकारी सहभागी झाले होते. व्यासपीठावर या वेळी आयआयएमएमचे माजी अध्यक्ष सुरेशकुमार शर्मा, श्रएम. के. भारद्वाज, पश्चिम विभागाचे अध्यक्ष अनिल केंभावी, परिषदेचे प्रायोजक आणि धूत ट्रान्समिशनचे उपाध्यक्ष अनंत बियाणी, डॉ. एल. जे. अहिरवाडकर, आयआयएमएम औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष अनिल पीपळकर, उपाध्यक्ष जितेश गुप्ता, खजिनदार रमेश जऊळकर, सचिव नरेंद्र जोशी, परिषदेचे अध्यक्ष सुनील वेद, स्मरणिका समिती अध्यक्ष मिलिद घोगले आदी उपस्थित होते. परिषदेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पटेल म्हणाले, की मटेरिल्स मॅनेजमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हे उद्योगांचा कणा आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक व्यावसायिकतेचा अंगिकार करणे गरजेचे आहे. नवीनवीन संकल्पना आणि कार्यक्षमता यांच्या बळावर आपण अनिश्चिततेवर नक्कीच मात करु शकतो. ग्राहकाला उच्च दर्जाचा माल मिळणे आणि उद्योगाची नङ्काक्षमता वाढणे अशा दुहेरी मार्गावरुन आपल्याला मार्गक्रमण करायचे असल्याने पारंपरिक पद्धतीने काम करुन चालणारच नाही. आपल्यामध्ये सातत्याने नावीन्याचा शोध घेण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रवृत्ती धारण करावी लागणार आहे. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. मूर्ती यांनी केले. या परिषदेत कोलगेट पामोलिव्ह इंडिया प्रा. लि. चे असोसिएट डायरेक्टर प्रदीप साहा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एसबीयु हेड जे. एम. म्हापगांवकर, अँड्रेस हाऊजरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीराम, रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष बी. व्ही. अय्यर, किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑङ्क अॅडव्हान्स मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. गोपाल अय्यंगार, एमआरसी लॉजिस्टिकचे विपणन उपाध्यक्ष आणि हेड कॉर्पोरेट सोर्स मुकुंद दत्तावाडकर आदींनी मार्गदर्शन केले.