प्रतिनिधी
औरंगाबाद : आपल्या कुटूंबासह इंग्लंडमध्ये वास्तव्य करीत असलेल्या महिलेची शहरातील नक्षत्रवाडी भागात असलेली एक एकर जमिन च्नक अज्ञात लोकांनी जालन्यातील एका व्यापाऱ्याला विक्री करून हडपण्याचा प्रयत्न या अनिवासी महिलेच्या भावामुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी जाहीर प्रगटन देणाऱ्या अॅड.संपत्तराज देवडा व अज्ञात महिलेसह जमिनीची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदर महिलेने पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे केली आहे. त्यावेळी सातारा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
डक्स बर्ग पार्क वॉशिग्टन येथे राहणाèया मंगल कमलाकराव येळनूरकर (६०) यांनी औरंगाबाद शहरात राहत असलेले त्यांचे बंधू डॉ. शरद शेषराव नांदेडकर (रा.टिळकनगर) यांनी सूचविल्यावरून १९८७ साली नक्षत्रवाडी गट क्रमांक २७ मध्ये २२ हजार रूपयांमध्ये एक एकर जमिन गोपीचंद हरचंद जाधव (रा.गेवराई तांडा) या शेतकèयांकडून विकत घेतली होती. येळनूरकर हे आपल्या कुटूंबासह मागील ३६ वर्षापासून इंग्लंड येथे राहतात. सन २००२ मध्ये त्यांना ब्रिटीश नागरीकत्व मिळाले असून मूळचे नागरीकत्व भारतीय आहे. नक्षत्रवाडीतील या जमिनीकडे येळनूरकर याचे भाऊ नांदेडकर हे अधून-मधून लक्ष देत असत. मात्र एक एकर असलेल्या या जमिनीची किंमत सध्या कोट्यवधी रूपये असल्याने त्याकडे भूखंड माफियांची नजर वळली. यावर्षी २७ एप्रिल २०१२ रोजी शहरातील एका दैनिकात या जमिनीविषयी जाहीर प्रगटन छापून आले. अॅड. संपत्तराज पुखराज देवडा यांनी नोटरी केलेल्या प्रगटनात ही जमिन येळनूरकर यांनी जालन्यातील व्यापारी गोपाळ सुर्यकांत वाघमारे (रा. रामनगर) यांना विक्री केल्याबाबत व इसार पावती केल्याचा उल्लेख होता. तसेच याबाबत कोणाला आक्षेप असल्यास त्याने तो नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही बाब येळनूरकर यांचे भाऊ नांदेडकर यांना समजताच त्यांनी इंग्लंडला फोन करून सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या मंगल येळनूरकर यांनी त्यांचे दीर अॅड. येळनूरकर यांना घडलेली घटना सांगितली. त्यांनी चौकशी केली असता या जमिनीबाबत मंगल येळनूरकर (रा.कोठा ता.जि.नांदेड) या नावाने अनोळखी महिलेचा फोटो लावून २९ मार्च २०१२ रोजी शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी, बनावट इसार पावती माझ्या नावाने करून ही जमिन ३८ लाख रूपयांत गोपाळ वाघमारे यांना विक्री केल्याचा उल्लेख आहे.रकमेपैकी ११ लाख रूपये नगदी व उर्वरित रक्कम तीन महिन्यापर्यंत qकवा त्यापूर्वी विक्री पत्र करून देईल असा उल्लेख होता. ही बाब अॅड. येळनूरकर यांनी मंगल यांना सांगितली. त्यामुळे त्या ताबडतोब ११ ऑक्टोबर रोजी भारतात आल्या.त्यांनी ही कागदपत्रे पाहिली असता त्यावर लावलेला महिलेचा फोटो व इसार पावती लिहून घेणारे गोपाळ वाघमारे यांना ओळखले नाही. तसेच साक्षीदार म्हणून बाळू कमलाकर येळनूरकर व डिगंबर बाबूराव कळसकर या दोघांच्या सह्या असून त्यांना देखील कमल येळनूरकर ओळखत नाहीत. त्यांच्या मुलाचे नाव समीर असून तो इंग्लंडमध्ये वास्तव्य करून आहे. हा सर्व बनावट खेळ पाहून येळनूरकर यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन अनोळखी भूखंड माफियांसह अॅड.संपत्तराज देवडा यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. आयु्नतांनी याची गंभीर दखल घेऊन हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविले असून पोलिस निरीक्षक अविनाश आघाव व सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबूराव कंजे हे तपास करीत आहेत.