प्रतिनिधी
औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीवरून प. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगलाच वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वादात आता प. महाराष्ट्रातील नेतेही वादग्रस्त विधाने करू लागले आहेत. मृत साठ्यातील पाण्याचे नियोजन करण्यात औरंगाबाद महानगरपालिका अयशस्वी ठरली आहे. शहराला होणाèया पाणी पुरवठ्यातील सुमारे ४५ टक्के गळती थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. या परिस्थितीला महानगर पालिकाच जबाबदार असून औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणीच कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत बोलताना केली आहे.
पत्रकारांनी जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणामधून पाणी सोडण्याबाबत होत असलेल्या मागणीबाबत विखे यांना विचारणा केली असता हा विखार बाहेर आला. ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी देण्याबाबत आमचा विरोध नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे अडीच टी.एम.सी. पाणी नगर जिल्ह्यातून सोडलेसुद्धा. पाणी ही राष्टड्ढीय संपत्ती आहे. मात्र, मराठवाड्यातील काही मंत्री या प्रश्नावरून अकारण राजकारण करीत असून त्यांनी वास्तव समजून घेतले पाहिजे. सध्या जायकवाडी धरणाच्या मृत साठ्यात २६ टीएमसी पाणी आहे. त्याचा वापर योग्य पद्धतीने केल्यास आठ महिने पाणी पुरेल. परंतु, औरंगाबाद महानगरपालिका त्याबाबत कुचकामी ठरली आहे. जायकवाडीमधून औरंगाबादला पाणी वाहून नेणाèया जलवाहिन्यांमधून ४५ टक्के पाण्याची गळती होते. ही गळती रोखण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मराठवाडा अथवा औरंगाबादमधील जमतेला पाणी देण्यास आमचा विरोध कधीही नाही, असेही त्यांनी सांगिले.