प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरातील विविध भागात महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढणाèया चिखलीतील तीन चोरट्यांना अंदाजे १० तोळे सोन्यासह सातारा पोलिसांनी अटक केली. या कारवाईने अनेक मंगळसूत्र चारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसाकडून व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील उल्कानगरी, जवाहरनगर, सातारा परिसरात मोटारसायकलवरुन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाèयांनी पोलिसासमोर आव्हान उभे केले होते. मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घडताच पोलिसांनी नाकाबंदी करुन चोरट्याना पकडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र नाकाबंदी असतानाही चोरटे पसार व्हायचे. खबèयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कंजे यांच्या पथकाने चिखली येथील तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अंदाजे १० तोळे सोने जप्त करण्यात आले असून त्यांच्या अन्य साथीदारांच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले आहे. आज दि. ६ रोजी सकाळी पोलिस निरीक्षक कंजे आणि त्यांच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींना पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या समोर उभे केले. अन्य काही गुन्हे उघड येण्याची शक्यता असल्याने आरोपीच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी आणि मुद्देमाल जप्त करण्यासाठी आरोपींचे नाव जाहीर करण्यात आले नाही.