प्रतिनिधी
औरंगाबाद : सोन्याचे शिक्के दाखवून पितळी धातूचे शिक्के विकणाèया गुजरातच्या एका भामट्यास पोलिसांनी सापळा लावून अटक केली. ही घटना सिल्लोड येथे भराडी नाका अन्वीकर पेट्रोलपंपाच्या आवारात घडली. पकडलेल्या आरोपीकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
सिल्लोड येथील जितेंद्र पाटील यांची भेट घेवून एका व्यक्तीने माझ्याकडे असलेली सोन्याची शिक्के विक्री करायचे असल्याचे सांगीतले. त्यांनतर पाटील यांनी त्याची पाहणी केली. यावेळी पाटील यांना असली सोन्याची शिक्के दाखविण्यात आले. मात्र संशय आल्याने त्यांनी सदरील माहिती सिल्लोड शहर पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोहेकॉ संजय मोरे व त्यांच्या पथकाने भराडी नाका येथील अन्वीकर पेट्रोलपंपाजवळ सापळा रचला. त्यानंतर पाटील यांनी शिक्के विक्री करणाèया राजूभाई यास सोन्याचे शिक्के दाखविण्यास सांगीतले. राजूभाई याने आपल्याकडील ४ सोन्याचे शिक्के दाखविले. मात्र, व्यवहार करतांना हातचलाखी करुन त्याने पितळी धातूचे शिक्के काढून दिले. हा बनाव लक्षात येताच सापळा लावून असलेल्या पोलिसांनी राजूभाई सलाट यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोहेकॉ संजय मोरे यांच्या ‘िर्यादीवरुन राजूभाई हसीभाई सलाट (४०, रा.रेल्वेस्टेशन, रामरामेश्वर, माताजी आखाडा, इंदर जि.सावरकाटा, गुजरात) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून रोख रक्कम, सोन्याचे व पितळी धातूचे शिक्के जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.