प्रतिनिधी
औरंगाबाद : अवैध दारू विक्रेत्याकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना फुलंब्री पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक साळवे यांना साथीदारासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
साळवे हे गणपत वाघ या मध्यस्थामार्फत लाच घेण्याचा प्रयत्न करत होते. चौका येथील रहिवासी गणेश जैस्वाल (४२) अवैध देशी दारू व बिअरची विक्री करत होते. त्यांच्यावर फुलंब्री ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. अलीकडच्या काळात गणेश जैस्वाल यांचा भाऊ दिनेश जैस्वालवरही दोन गुन्हे दाखल आहेत. चौका येथील बीट जमादार म्हणून कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक साळवे यांनी गणेश जैस्वाल यांना बोलावून तुमच्या विरुद्ध जुन्या केसेस आहेत. त्या चॅप्टर केस करायची नसेल तर ५ हजार रुपये आणून दे, अशी धमकी दिल्याची तक्रार गणेश जैस्वाल यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार जैस्वाल यांनी साळवे यांना ५ हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पंचांसमक्ष त्यांनी ही रक्कम खाजगी व्यक्ती गणपत वाघ यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार जैस्वाल यांनी गणपत वाघ यांच्याकडे ५ हजार रुपये देताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्या दोघांनाही रंगेहाथ पकडले. ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक एस. डी. बाविस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक एम. एच. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक बाबाराव मुसळे, एस. आर. ठोंबरे, पोलिस निरीक्षक किशोर पवार, श्यामसुंदर कौठाळे, लक्ष्मीकांत खडके, सुधाकर मोहिते, सुनील फेपाळे, अजय आवले, सचिन शिंदे आदींनी यशस्वी केली.