प्रतिनिधी
औरंगाबाद : विद्यापीठात शिकत असलेल्या विदेशी व भारतीय विद्याथ्र्यांना पास होताच दिक्षांत समारंभापूर्वी पदवी प्रमाणपत्र मिळणार हा निर्णय झाल्यानंतर पाच विद्याथ्र्यांना मंगळवारी कार्यक्रमात कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या हस्ते पदवी प्रदान करुन प्रारंभ केला.
हैदर करिम हाशीम पीएच डी (इराक), सलिम अब्दूल हदीम, नफा मोहम्मद हारबी (इराक) व स्वप्नील चौधरी (बीई), खान बशीर अहमद या भारतीय विद्याथ्र्यांना कुलगुरु यांच्या हस्ते समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभात मार्गदर्शन करताना कुलगुरु म्हणाले की, पदवी घेतली म्हणजे शिक्षण पूर्ण झाले असे समजू नका. पदवी ही पुढील आयुष्यातील यशासाठी उत्तेजनार्थ असते. विदेशी विद्याथ्र्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदवीसाठी दिक्षांत समारंभाची वाट बघावी लागत होती. त्यांचा विदेशी परवाना केवल शैक्षणिक कालावधी पुरताच मर्यादीत असतो. यामुळे या विदेशी विद्याथ्र्यांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत होते. म्हणून राज्यपालांच्या दिक्षांत समारंभापूर्वी ज्या विद्याथ्र्यांना गरज आहे ते अर्ज करून पदवी घेवू शकतात, असा विद्यापीठाने निर्णय घेतला. या समारंभात परिक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. वाल्मिक सरवदे, विदेशी विद्यार्थी विभाग संचालक डॉ. साधना पांडे, संचालक डॉ. शिनगारे व अकरा देशातील विद्यार्थी उपस्थित होते.