संजय जोशी उपमहापौर
प्रतिनिधी
औरंगाबाद : युती आणि आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या औरंगाबाद मनपा महापौर, उपमहापौर निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पुन्हा शिवसेनेने महापौर पदावर यश मिळवले असून, सेनेच्या कला ओझा या महापौर झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे संजय जोशी उपमहापौर म्हणून निवडून आले.
मनपाच्या कै. प्रबोधनकार ठाकरे सभागृहात दुपारी बारानंतर दोन्ही पदांसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात कला ओझा यांच्या रुपाने शहराला १९ व्या महपौर मिळाल्या आहेत. त्या आठव्या महिला महापौर ठरल्या आहेत. यापूर्वी सात महिला महापौर राहिल्या आहेत. शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष, अशी थेट लढत दोन्ही पदांसाठी झाली. महापौरपदासाठी ६, उपमहापौरपदासाठी १२ अर्ज आले होते. त्यात ५८ मते घेऊन आघाडीच्या फिरदोस फातिमा यांचा कला ओझा यांनी पराभव केला. फातिमा यांना ४० मते मिळाली. कालपर्यंत आघाडीकडून कविता जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. ऐनवेळी आघाडीने फातिमा यांना उमेदवार जाहीर केल्याने आघाडीला पराभव पत्कारावा लागला, अशी चर्चा आहे. उपमहापौरपदी निवड झालेल्या भाजपच्या संजय जोशी यांना ५६ मते मिळाली. त्यांनी भाजपचे निलंबित सदस्य राजू शिंदे यांचा पराभव केला. राजू शिंदे यांना ४३ मते मिळाली. नगरसेवकांची पळवापळवी, राजकीय कुरघोड्या, गटबाजी आदीमुळे ही निवडणूक गाजली होती. शिवसेना- भाजपाला नगरसेवकांची मोट बांधता-बांधता नाकीनऊ आले होते. मनपात काँग्रेसचे १९, राष्ट्रवादीचे ११, असे ३० सदस्य आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक शहरातच मुक्कामी होते, तर सहलीवर असलेले शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष नगरसेवक पहाटे शहरात परतले. युतीकडून सहा जणांना दिल्ली, अजमेरला पाठवण्यात आले होते. तेही पहाटे दाखल झाले. उपमहापौरपदी हमखास विजयाची खात्री पटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप निलंबित राजू शिंदे यांना थेट ‘रेड कार्पेड’ अंथरले. रात्री उशिरा सिंचन भवन येथे तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाबरोबरच उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
शहरवासियांचा विश्वास सार्थ ठरवू
महिला आघाडीच्या सामान्य कार्यकर्तीला शहराची महापौर बनण्याचा मान केवळ शिवसेनेमुळे मिळाला असून, शहराचा विकास साधून जनतेच्या विश्वास पात्र ठरण्याचा प्रयत्न मी करेल, अशी प्रतिक्रिया निवड झाल्यानंतर कला ओझा यांनी औरंगाबाद न्यूज लाइव्हशी बोलताना दिली.
महापौरपदासाठी आलेले अर्जकला ओझा (शिवसेना), कीर्ती शिंदे (अपक्ष), नीला जगताप (राष्ट्रवादी), फिरदोस फातेमा (काँग्रेस), कविता जाधव (काँग्रेस)
उपमहापौरपदासाठी केलेले अर्ज
शहानवाज खान (अपक्ष), अब्दुल रऊफ खान महेबूब खान ऊर्फ खलील खान (राष्ट्रवादी), प्रमोद राठोड (काँग्रेस), कृष्णा बनकर (अपक्ष), कैलास गायकवाड (अपक्ष), शेख असद पटेल (काँग्रेस), राजू शिंदे (अपक्ष), संजय जोशी (भाजप), मधुकर सावंत (अपक्ष), ख्वाजा शरफोद्दीन (राष्ट्रवादी) अणि परवीन कैसर खान (राष्ट्रवादी).