प्रतिनिधी
औरंगाबाद : समाजात घडणाऱ्या चांगल्या
घडामोडींची आणि सकारात्मक बाबींची दखल प्रसार माध्यमांनी घेतली पाहिजे. असे
मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय
पांढरीपांडे यांनी व्यक्त केले.
युनिसेफ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासकीय योजनांच्या प्रसिध्दीसाठी संपर्क कौशल्ये’ या विषयावर मराठवाडा महसूल प्रबोधिनीमध्ये कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक प्रमोद नलावडे यांच्यासोबत मराठवाडा विभागातील उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, माहिती सहाय्यक आणि विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. पांढरीपांडे म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून निर्णय घेतल्यास त्यास सर्वांचा पाठिंबा मिळतो. बातम्यांमुळे समाजावर चांगला-वाईट परिणाम होत असतात त्यासाठी माध्यमांनी सामाजिक भान ठेवले पाहिजेत असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना असुन लोकापर्यंत पोहचविणे गरजेेचे आहे. त्याचप्रमाणे सचिव प्रमोद नलावडे म्हणाले की, अलिकडच्या काळात माध्यमांच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून येत आहे. त्यावर माहिती महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी मराठवाडा विभागाचे संचालक अजय अंबेकर, लातूर विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी, गणेश मांडेकर आदी मोठया संख्येने अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.