प्रतिनिधी
औरंगाबाद : भंडारदरा, निलवंडे धरणातून
सोडलेले अडीच टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आले. परंतु एक
टीएमसी पाणी न आल्यामुळे औरंगाबाद, जालना जिल्हयात पाण्याची टंचाई
कायम राहणार आहे.
जायकवाडी धरणात तीन टक्के पाणी राहिल्याने राजकीय हस्तक्षेपातून निलवंडे धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र वरच्या धरणातील पात्र कोरडे राहिल्याने सोडण्यात आलेले पाणी पूर्णपणे जायकवाडीसाठी आले नाही. दरम्यान, आजमितीला जायकवाडी धरणाची पाणीपातळी 4.5 टक्के एवढी असुन सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी 0.87 टीएमसी पाणी आल्याची नोंद करण्यात आली आहे. सदरील पाणी तीन महिन्यांपर्यंत पुरेल एवढेच राहणार असून येणाऱ्या काही दिवसात औरंगाबाद, जालना जिल्हयात पाणीटंचाई कायम राहणार आहे. भंडारदरा, निलवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी मधमेश्वर धरणापर्यंत असून जायकवाडीला एक टीएमसी पाणी मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.