प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरातील व्यावसायिक इमारतींना वेगवेगळा कर लावण्यात आल्याचा मुद्दा नगरसेवकांनी स्थायी समितीत मांडला. त्यावर व्यावसायिक इमारतींचे सर्वेक्षण करून नव्याने कर लावण्याच्या सूचना स्थायी समितीचे सभापती विकास जैन यांनी अधिकाèयांना दिल्या.
महानगरपालिकेत स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत नगरसेवक नारायण राणे यांनी महापौर कला ओझा यांचे वाहन बंद पडत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर शहर अभियंता एम.डी.सोनवणे यांनी अधिकाèयांना खुलासा करण्यास सांगितले. सिरसाठ यांनी महापौरांची गाडी नवीन असल्याचे केलेल्या खुलाशात सांगितले. परंतु यावर स्थायी समितीचे सभापती व शहर अभियंता सोनवणे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे महापौरांना पर्यायी वाहन देण्याची व्यवस्था करावी व सध्याच्या वाहनाची एजन्सीकडून दुरुस्ती करून अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच नगरसेवक राजू वैद्य यांनी शहरातील व्यावसयिकांना लावण्यात आल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. काही भागातील गरीब नागरिकांना महानगरपालिका कर्मचारी नियमात बसून कर लावतात. मात्र मोठ्या हॉटेल्स, लॉन्स यांच्याकडून कर आकारणी योग्यरित्या झाली नसल्याचे स्पष्ट मत मांडले. त्यावर नगरसेवक बालाजी मुंढे यांनी मंगल कार्यालये, लॉन्स यांना कशापध्दतीने कर आकारला याची माहिती अधिकाèयांनी द्यावी, अशी मागणी सभापतींकडे केली. या प्रश्नांवर खुलासा करताना अधिकाèयांनी काही हॉटेल्सला जुन्या आकाराने व्यावसायिक कर लावला असल्याचे सभेत सांगितले. या मुद्यावर सभापती विकास जैन यांनी व्यावसायिक इमारती, मंगल कार्यालये, मोठ्या हॉटेल्स यांना लावण्यात आलेल्या कराचे सर्वेक्षण करून नव्याने कर लावण्यात यावे, अशा सूचना अधिकाèयांना देण्यात आल्या. याबरोबरच शिलाई मशीनचे त्वरित वाटप करण्यात यावे, अशाही सूचना केल्या.