प्रतिनिधी
औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पातील पाणीपातळीत रोज बाष्प व वापरामुळे साठ्याच्या ०.१ पूर्णांक घट होत असून, सध्या ३.५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराला वर्षभर पाणी पुरणे अशक्य आहे. सध्या जायकवाडीत उपयुक्त पाणीसाठा हा ५६.६१ दलघमी असून हे पाणी औरंगाबाद, जालना जिल्ह्यांसाठी किती महिने पुरेल याचे नक्की गणित बांधता येणार नाही. धरणात आणखी २.५ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. जायकवाडीत २.५ टीएमसी पाणी द्यावे, या निर्णयावर काही मंत्रींनी विरोध केल्याने बैठकीत पाणी सोडण्या संदर्भात निर्णय होऊ शकला नाही.