प्रतिनिधी
औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी परिसरातील बकवालनगरमधील शेताला फटाक्यांमुळे आग लागली. यात ४ एकर ऊस खाक झाला.
शेतमालक अंबादास विनायक पिसोळकर यांचे या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. काही जळते फटाके त्यांच्या शेतात येऊन पडले व उभा ऊस पेटल्याचे त्यांनी सांगितले. शेताजवळ वसाहत असल्यामुळे रहिवासीही घाबरून गेले. अग्निशामक दल, वाळूज व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग वसाहतीत पोहचण्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगापूर-खुलताबाद विधानसभा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर पाटील नीळ, जोगेश्वरीचे सरपंच योगेश दळवी, शंकर राठोड, शिवाजी एखंडे, सुभाष नजन, दादासाहेब वालतुरे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.