खासदार खैरेंची घोषणा
प्रतिनिधी
औरंगाबाद : कैलास नगर वॉर्ड क्र. 58 मध्ये पाणी व ड्रेनेज लाईन, रस्ता विकास कामाचे उद्घाटन शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. कैलासनगर विकासासाठी आपल्या खासदार निधीतून 20 लाखाचा निधी देणार असल्याची घोषणा यावेळी खा. खैरे यांनी केली. खा. चंद्रकांत खैरे यांच्या प्रयत्नाने महापालिकेत पुन्हा युतीची सत्ता आल्याबद्दल काजू मिठाईची तुला कैलासनगरचे नगरसेवक आगाखान याच्यातर्फे करण्यात आली. यावेळी महापौर कला ओझा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौर कला ओझा म्हणाल्या की, रस्ता रुंदीकरणात योगदान दिलेल्या नागरिकांवर अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेणार असून, स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरेसवक आगा खान, नरेश भालेराव, गणेश अंबिलवादे, रोहिद उदावंत, मोबीन भाई, सुरेश गुंजाळ, रोहित श्रीवास्तव, बबलू कदम, छाया भालेराव, जंगमबाई वडम, अलका वडमोरे, लता इंगळे, जयश्री कोठाळे, अशोक भालेराव, अमोल भालेराव, हाफीसा शेख, उषा बनकर, अनिकेत राठोड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.