वैजापूर : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तालुक्यातील २५ पैकी १९ ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हाती आल्या असून यातील ७ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महिलांची वर्णी लागली आहे.तर याशिवाय वक्तीपानव- पानवी ब्रु,हिलालपूर-कोरडगाव,बेलगाव,तिडी-मकरमतपूरवाडी, अव्वलगाव-हमरापूर या ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदावर महिलांची निवड करण्यात आली आहे.१७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत या २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाच्या निवडी करण्यात आल्या. तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची नावे पुढीलप्रमाणे- भग्गाव- कारभारी जगताप, शोभा शेटे,कोल्ही-कैलास पवार,ज्ञानेश्वर मगर, पुरणगाव-व्दारकानाथ ठोंबरे,दामुबाई गरुड, कविटखेडा-बिरोळा - विजय बोलधने, गणेश जाधव, डागपिंपळगाव - बबन परमेश्वर, दिपक रोठे, हिंगणेकन्नड - अतुल निकम, निर्मला म्हस्के,नादी- नंदाबाई खिल्लारी, दत्तू नजन, गोलवाडी- मंगल पगार,पाटीलबा कोकाटे,हनुमंतगाव-शोभा भांडे,निरंजन खैरनार, हिलालपूर-कोरडगाव- रुख्मणबाई बोर्डे,मेघा कर्डिले, पानवी खंडाळा/लाख खंडाळा- अलका आहेर, राजेंद्र बावचे , वांजरगाव- संध्या कासार, सय्यद तौसीफ , पानवी ब्रु.- वक्तीपानव-संगीता गुडदे,ज्योती जाधव, तिडी-मकरमतपूरवाडी-शालिनी डुकरे,मंगल आहेर,अव्वलगाव-हमरापूर-कविता सवाई,लता काळे, टुनकी-दस्कुली - सविता गोरे, मच्छिंद्र निकम , कनकसागज - राधा धारबळे , भाऊसाहेब बुट्टे,पारळा- मनीषा आहेर,बाबासाहेब बावके,खरज-तित्तरखेडा-जिजाबाई नारळे,दत्तात्रय कुंदे, महालगाव- सरिता बुट्टे,सुरेश आल्हाट,माळीघोगरगाव-हेमलता पठाडे,संतोष वैराळ,बेलगाव-बेबी सोनवणे,मंगल जगदाळे, नांदूरढोक-बाभूळगावगंगा-अनिता डेंगळे, विनायक गाडे, बाबतारा - सरला त्रिभुवन, बाबासाहेब पानसरे,व रोटेगाव - सुशीला गोरे,धीरजसिंह राजपूत.