Home » , , » किशोरवयीन युवकाने केला बालिकेचा खून

किशोरवयीन युवकाने केला बालिकेचा खून

Written By Aurangabadlive on सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२ | ९:४७ AM

प्रतिनिधी
औरंगाबाद : अनैतिक संबंध लपवून ठेवण्यासाठी १७ वर्षीय युवकाने ११ वर्षीय बालिकेचा गळा दाबून खून केला. या बालिकेच्या १६ वर्षीय बहिणीशी या युवकाचे प्रेमसंबंध होते. दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्याने तिच्यावर थेट मरणाची वेळ आली. पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.
पूजा चंद्रकांत राठोड (रा. गल्ली नंबर ३, नारेगाव) असे मृत मुलीचे नाव आहे.  एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणपत दराडे यांनी सांगितले की, पूजाच्या १६ वर्षीय बहिणीशी आरोपीचे तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. २४ नोव्हेंबरच्या सायंकाळी पूजाचे आई-वडील घरी नव्हते. पूजा बाहेर खेळत होती. काही वेळानंतर ती घरी आली असता मोठी बहीण आणि आरोपीला तिने नको त्या अवस्थेत बघितले. हे ती दोघांच्याही आई-वडिलांना सांगणार असल्याने पूजाने त्यांना सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने प्रेयसीच्या ओढणीने पूजाचा गळा आवळला. पूजाच्या बहिणीने प्रतिकार केला; परंतु तिने आपले हे प्रकरण आई-वडिलांना सांगितल्यास अनर्थ होईल, असे म्हणून त्याने तिला गप्प बसविले. पूजाने गळफास घेतला होता, तिला आम्ही खाली काढले, असे लोकांना सांगितले. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात (घाटी) दाखल केले. त्यावेळी पूजा बेशुद्ध पडली होती, असे डॉक्टरांना सांगितले. याची एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. डॉक्टरांनी पूजाचे शवविच्छेदन केले. नंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांसह, तिची बहीण आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. चौकशीत पूजाच्या बहिणीने सर्व खरा प्रकार सांगितला.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.