ताज्या बातम्या
offbeat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
offbeat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मराठी विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाकडे : कोत्तापल्ले
औरंगाबाद : मराठी विद्यापीठाच्या
स्थापनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, असे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सांगितले.
मराठी भाषेचे पुढील २५ वर्षांचे धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारने डॉ. कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यासंदर्भात तज्ज्ञ, अभ्यासक व नागरिकांच्या सूचना व मते समितीने येथे जाणून घेण्यात आली. मसापच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. कोत्तापल्ले होते. समितीचे सदस्य प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. संजय गव्हाणे, प्राचार्य कौतिकराव ठाले, कुंडलिक अतकरे यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती. नागरिकांनी केलेल्या सूचनांविषयी बोलताना डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, भाषेचे पुढील २५ वर्षांचे धोरण तयार करून आम्ही शासनाला जूनअखेरपर्यंत अहवाल देणार आहोत.
काँग्रेसतर्फे बटूंचा उपनयन संस्कार सोहळा
औरंगाबाद : १७ बटूंचा सामूहिक उपनयन संस्कार सोहळा शहर काँग्रेसतर्फे काल सकाळी उल्कानगरीतील रामायणा कल्चरल हॉलमध्ये पार पडला. या वेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ उपस्थित होते. हा उपनयन संस्कार सोहळा वेळेवर व्हावा यासाठी सामूहिक उपनयन संस्कार समितीचे सुरेंद्र मंडलिक, अक्षय कुलकर्णी, प्रशांत जोशी, आशा कुलकर्णी, नरेंद्र देश
पांडे, लक्ष्मीकांत मुन्शी, नितीन देशपांडे, वसंत किनगावकर, डॉ. सुरेश जोशी, कालिदास त्रिवेदी, मीनाक्षी देशपांडे, महेश कुलकर्णी, विवेक जोशी, ऋषिकेश महाजन आदींनी परिश्रम घेतले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



