औरंगाबाद : १७ बटूंचा सामूहिक उपनयन संस्कार सोहळा शहर काँग्रेसतर्फे काल सकाळी उल्कानगरीतील रामायणा कल्चरल हॉलमध्ये पार पडला. या वेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ उपस्थित होते. हा उपनयन संस्कार सोहळा वेळेवर व्हावा यासाठी सामूहिक उपनयन संस्कार समितीचे सुरेंद्र मंडलिक, अक्षय कुलकर्णी, प्रशांत जोशी, आशा कुलकर्णी, नरेंद्र देश
पांडे, लक्ष्मीकांत मुन्शी, नितीन देशपांडे, वसंत किनगावकर, डॉ. सुरेश जोशी, कालिदास त्रिवेदी, मीनाक्षी देशपांडे, महेश कुलकर्णी, विवेक जोशी, ऋषिकेश महाजन आदींनी परिश्रम घेतले.