औरंगाबाद : मराठी विद्यापीठाच्या
स्थापनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, असे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सांगितले.
मराठी भाषेचे पुढील २५ वर्षांचे धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारने डॉ. कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यासंदर्भात तज्ज्ञ, अभ्यासक व नागरिकांच्या सूचना व मते समितीने येथे जाणून घेण्यात आली. मसापच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. कोत्तापल्ले होते. समितीचे सदस्य प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. संजय गव्हाणे, प्राचार्य कौतिकराव ठाले, कुंडलिक अतकरे यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती. नागरिकांनी केलेल्या सूचनांविषयी बोलताना डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, भाषेचे पुढील २५ वर्षांचे धोरण तयार करून आम्ही शासनाला जूनअखेरपर्यंत अहवाल देणार आहोत.