Home » » अंगठी खरेदी

अंगठी खरेदी

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २४ मे, २०१३ | १०:१९ AM


पूर्वीच्या काळात साखरपुडा झाल्याशिवाय मुली अंगठ्या घालायच्या नाहीत. अगदी घातल्याच तर त्या खèया सोन्याचा असायच्या. पण हल्ली तर लहान मुलींपासून ते मोठ्या बायकांपर्यंत खोट्या, इमिटेड अंगठ्या घालायची भारी हौस दिसतेय. त्यामुळे मार्केटमध्ये फॅशनेबल, इमिटेड डिझाइन्ड अंगठ्यांचा टड्ढेंड आहे. फ्लॉवर प्रिंट, अ‍ॅनिमल प्रिंट, कुंदन, कलर्ड स्टोन्स, मोती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरिअल्सचा वापर करून मोठ्या साइझच्या अंगठ्या सध्या मार्केटमध्ये येताहेत आणि या मोठ्या अंगठ्यांची मुलींमध्ये, महिलांमध्ये मोठी चर्चा आहे.
विशेषतः एखाद्या कार्यक्रम किंवा पार्टीला जाताना आपल्या डड्ढेस कोडप्रमाणे अशी एखादी मोठी अंगठी जर घातली, तर त्याने नक्कीच एक वेगळा लूक येतो असं फॅशन इंडस्टड्ढीतल्या ज्वेलरी डिझायनर्सचं म्हणणं आहे. त्यांच्या मते फॅन्सी अनारकली डड्ढेस किंवा पंजाबी ड्रेसवर मोठ्या स्टोनचे किंवा मोतीवाल्या अंगठ्या छान दिसतात. याउलट कॅज्युअल लूकवर फ्लॉवर प्रिंट, अ‍ॅनिमल प्रिंट, राउंड टाइप्सच्या अंगठ्या जास्त सूट करतात. पण अशावेळी हातात एकच अंगठी असलेली बरी. दोन-तीन मोठ्या अंगठ्या फार विचित्र वाटू शकतं. अगदी ५० रुपयांपासून ५ हजारांपर्यंत या इमिटेड फॅन्सी अंगठ्या मार्केटमध्ये मिळतात. कॉलेज तरुणी तर कॉलेजला किंवा एखाद्या पार्टीला जाताना सर्रास अशा स्टायलिश अंगठ्या घालून जातात. अनेक महिलाही ऑफिस किंवा कार्यक्रमाला जायच्यावेळी मोठ्या अंगठ्यांना पसंती देतात. गंमत म्हणजे लहान मुलींमध्येही कार्टून डिझाइन, फ्लॉवर प्रिंट, अ‍ॅनिमल प्रिंट, असणाèया अंगठ्यांची क्रेझ वाढत चाललीय. मालिकांमधल्या नायिका आणि खलनायिकाही अशा मोठ्या अंगठ्या वापरतात. पुरस्कार सोहळे असोत. सिनेमाचं प्रमोशन असो. अशा सगळ्या कार्यक्रमांना नायिका अशा मोठ्या, महागड्या अंगठ्या घालून मिरवत असतात. अगदी सगळ्या वयातल्या स्त्रियांना शोभून दिसेल आणि आवडेल अशी ही अंगठ्यांची फॅशन आहे. या अंगठ्या मुळात खूप आकर्षित असतात आणि त्या घातल्यावर आपला हात जास्त छान दिसतो. सो, मुलींनो.. वाट कसली बघताय. मस्तपैकी तुम्हीही एखादी सुंदर मोठी अंगठी घालून जा.

Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.