५० हजार युवती येणार
औरंगाबाद : शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणावर होणाèया राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्याला राज्यभरातून ५० हजार युवती येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली. सध्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे, असेही त्यांनी सांगितले.
मेळाव्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातून युवती येणार असल्याने त्यांच्या राहण्यासाठी जालना, लासूरसह शहरातील ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सभामंडपात युवती आणि निमंत्रितांशिवाय इतरांना प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगून पिचड म्हणाले, की युवतींपुढील प्रश्न व सामाजिक आव्हानांवर मेळाव्यात सविस्तर चर्चा होणार आहे. पक्षाध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार तारिक अन्वर, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील हेही मेळाव्याला आवर्जून हजर राहणार आहेत. आदींचीहीप्रमुख उपस्थिती राहील. राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे महिला व युवतींनी राजकारणात सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे, हा संदेश मेळाव्याच्या माध्यमातून दिला जाणार आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यभरात ४७ मेळावे झाले आहेत. २८ ऑक्टोबरला सभा होऊन मेळाव्यांची सांगता होईल. औरंगाबादच्या मेळाव्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन, राज्यात झालेल्या युवती मेळाव्यांचे छायाचित्र प्रदर्शन आदींचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला मधुकरअण्णा मुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, नीलेश राऊत, एकनाथ गवळी, सुरजितसिंग खुंगर, बाबूराव पवार, नीलेश राऊत यांची उपस्थिती होती.