मुलगी पटविण्यात आपल्याला येणारी अडचण आता थेट शास्त्रज्ञांनीच सोडविली असून, त्यांनी एक चांगला उपाय तमाम प्रियकरांना सूचवला आहे. त्यांनी सांगितले आहे की, जर आपली इच्छा असेल की मुली आपल्याकडे आकर्षिक व्हाव्यात तर स्माईल देण्याऐवजी विचारमग्न असल्याचे दाखवा. मुलगी लगेच फिदा होईल! कनाडा येथील संशोधकांनी हे अनोखे संशोधन केले आहे. संशोधनात म्हटले आहे, की महिला नेहमीच आनंदीत राहणाèया पुरूषांपेक्षा त्या पुरूषांकडे जास्त आकर्षित होतात ज्यांचा व्यवहार नेहमी बदलत राहतो. कोणत्याही गोष्टींवर गंभीरतेने विचार करणारे आणि त्यानंतरच निर्णय घेणारे पुरूष महिलांना आवडत असतात. उगीच हसून आकर्षित करणाèया पुरूषांना त्या कोणतेही महत्त्व देत नाहीत. महिला जेव्हा दीर्घकाळाच्या रिलेशनशीपची अपेक्षा ठेवतात तेव्हा लैंगिक आकर्षणापेक्षा त्यांना जोडीदार आपल्याप्रती किती गंभीर आहे, याचा विचार करत असतात. पण याचाच अर्थ पुरूषांनी कायम धीरगंभीर राहून वावरावे, असा होत नाही, असेही संशोधकांनी म्हटले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या मनोवैज्ञानिक प्रो. जेसिका ट्रेसी यांनी म्हटले आहे, की या संशोधनामुळे हे निष्पन्न झाले आहे की महिला आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत qकवा प्रेमसंबंधांबाबत गंभीर असतात.
Home »
» दात न काढता विचारमग्न असल्याचे दाखवा... मुलगी होईल फिदा