अवघ्या देशाच्या कृषी खात्याचा कारभार सांभाळणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वमान्य नेतृत्त्व आहे, यात कुणाचे, किमान महाराष्ट्रातील तरी, दुमत असणार नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक कार्यकत्र्याची, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना, थेट नावानिशी शरद पवार त्याला ओळखतात, इतपत पवारांना महाराष्ट्राची ओळख आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत इतका महाराष्ट्र ओळखणारा आणि पायाखालून घातलेला पवारांसारखा दुसरा नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही आणि पुढेही होईल, याची खात्री देता येत नाही. अर्थात, पवारांइतकाच विलासराव देशमुख यांनाही महाराष्ट्राचा अभ्यास होता आणि त्याच जोरावर त्यांनी महाराष्ट्राचे दोन वेळा नेतृत्त्व केले होते. पवारांइतकाच महाराष्ट्राचा दांडगा अभ्यास असलेले आणि राज्यातील इतक्या प्रचंड प्रमाणात ‘मासङ्क मागे असलेले विलासराव आता हयात नाहीत. पण त्यांच्या अंत्ययात्रेला उसळलेला जनसागर पाहूनच महाराष्ट्राचे त्यांच्यावर किती प्रेम होते, हे दिसून आले. शरद पवारांना महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील खडा न् खडा माहिती आहे, मग ती आर्थिक स्थिती असो वा पीकपाणी. अनुशेष असो qकवा शेतकèयांची अवस्था, राजकीय असो वा सामाजिक, अशा प्रत्येक क्षेत्राबाबत पवारांचा दांडगा अभ्यास आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. विशेषत: शरद पवारांचे मुरब्बी राजकारण हा महाराष्ट्रासाठी अभ्यासाचाच विषय ठरावा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या शब्दाला qकमत आहे qकवा ज्यांच्या एका वक्तव्यावर qकवा शब्दावरही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वाèयाची दिशा बदलू शकते, अशा नेत्यांमध्ये शरद पवारांचे नाव सर्वांत पुढे आहे. गेल्या पाच दशकांपासून शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात एक एक पायरी चढत आज केंद्रीय कृषिमंत्रीपदापर्यंत गेले आहेत. महाराष्ट्रातून केंद्रात गेल्यानंतर पवारांनी थेट सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्त्वाचा मुद्दा पुढे करीत पवारांनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूकही लढविली होती. नंतर याच मुद्यावर त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र, आता बारा वर्षांनंतर याच राष्ट्रवादीची सूत्रे इतरांच्या हातात जाणार, अशी चर्चा सुरू झाली अन् पवारांना पुन्हा एकदा ‘राष्ट्रवादीचा कारभारी मीचङ्क, असे ठणकावण्याची वेळ आली, यामागे नक्कीच काहीतरी गुपित दडले आहे. शरद पवार केंद्रात कारभार करीत असताना महाराष्ट्रातील पक्षाची धुरा त्यांनी अजित पवार या आपल्या पुतण्याकडे सोपविली होती. त्यातच केेंद्रीय कृषिमंत्री पद सांभाळतानाच आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि नंतर त्या माध्यमातून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले. यामुळे महाराष्ट्रात आणि विशेषत: पक्षाच्या राज्यस्तरीय राजकारणाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नव्हता, हे खरे आहे. पण, आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या राज्य पातळीवर नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या दुफळीवर बोट ठेवीत, या पक्षाचे सर्वेसर्वा आपणच आहोत, हे दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून दाखवून दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वावरून संघर्ष सुरू असल्याचे चित्र अवघा महाराष्ट्र पहात आहे. विशेषत: शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे या खासदार कन्येने महाराष्ट्रात लक्ष घालण्यास सुरूवात केल्यापासून अजित पवार दुखावल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचे उत्तराधिकारी कोण?, अजित पवार की सुप्रिया सुळे, अशी चर्चाही सुरू झाली. त्यातच qसचन खात्यातील गैरव्यवहाराच्या आरोपानंतर अजित पवारांनी अचानक राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सोडण्याबरोबरच मंत्रिमंडळातूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या साèयामागेही शरद पवारांशी त्यांचे पटत नसल्याच्या चर्चेने वेग धरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असले तरी ते केंद्रात मशगुल झाल्यापासून राज्यात या पक्षामध्ये अजित पवारांनी आपला मोठा गट निर्माण केला, हे सर्वश्रुतच आहे. याच जोरावर अजितदादा पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेत होते qकवा आपल्या मनासारखे निर्णय घ्यायला पक्षश्रेष्ठींना म्हणजेच काका शरद पवारांना भाग पाडत होते. शिवाय, एकत्रित सत्ता राबवित असतानाही अजित पवारांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. अगदी, राज्यातील काँग्रेस-आघाडीचे सरकार पडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अर्थात, यावेळी शरद पवार मात्र शांत राहिले. याचवेळी अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपद सोडले आणि सारे चित्रच पालटले. पवारांनी या साèयाचा फायदा करून घेत पुन्हा एकदा राज्यावर लक्ष केेंद्रीत करून राष्ट्रवादीवरील ढिली झालेली पकड घट्ट केली. आता तर त्यांनी डोईजड ठरू पाहणाèया अजित पवारांना धक्के देणेही सुरू केले आहे. अजित पवारांच्या मागण्यांना कात्रजचा घाट दाखवित सीनियर पवारांनी दोन नियुक्त्याही करून आपणच राष्ट्रवादीचे कारभारी असल्याचे दाखवून दिले आहे. अजित पवार समर्थक किरण पावसकरांना डावलून शरद पवारांनी सुप्रिया सुळे गटाच्या संजय दिना पाटील यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोपविले, तर पुण्याचे पालकमंत्रीपद तटकरे-टोपे या अजितदादा समर्थकांना न देता तिथे आपले विश्वासू सचिन अहिर यांना नेऊन बसविले. दुसरीकडे, ज्या पृथ्वीराज चव्हाणांना टार्गेट करीत अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपद सोडले, त्याच पृथ्वीराजबाबांना आता शरद पवारांनी पुण्यात पक्षाच्या अधिवेशनात बोलत असताना चांगले काम करीत असल्याचे सर्टिफिकेटही देऊन टाकले. पवारांच्या या कृती अजितदादांना नक्कीच धक्का देणाèया ठरल्या आहेत. शिवाय या माध्यमातून त्यांनी अजितदादांच्या पाठिशी उभे राहणाèयांनाही त्यांनी इशारा देऊन टाकला आहे. अजित पवारांना मानणारा मोठा गट राष्ट्रवादीत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा गट जास्तच सक्रीय झाला होता. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर हा गट त्यांनी घेतलेले निर्णय असे अचूक होते, त्यांची कार्य करण्याची पद्धत, धडाकेबाज कार्यपद्धती याची तारीफवर तारीफ करीत होता. पण, राष्ट्रवादीच्या पुण्यात पार पडलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात शरद पवारांनी ‘राष्ट्रवादीचा कारभारी मीचङ्क, असे स्पष्ट करून या साèयांची हवाच काढून घेतली आहे. पक्षात अजित पवारांच्या शब्दाला मान असला तरी अखेरचा शब्द माझाच असेल, असेच शरद पवारांनी या वक्तव्यावरून दाखवून दिले आहे. शिवाय उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीतील स्वत:चा वेगळा गट वाढविण्यासाठी सक्रीय होत राज्यभर दौरे काढून त्यादृष्टीने चाचपणी करणारे अजित पवार यांना चपराकही दिली आहे. तसेच राष्ट्रवादीतील शरद पवारांचा उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे?, यावरून पक्षात निर्माण झालेल्या गोंधळालाही पूर्ण विराम दिला आहे. अर्थात, पवार आज बोलतील, तेच उद्याही कायम ठेवतात, असे नसते, याचा अनुभव आजवर महाराष्ट्राने घेतलेला आहेच. त्यामुळे आता त्यांचे पुढील पाऊल काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.