वाईटावर सत्याच्या विजयाचे प्रतिक असलेला दसèयाचा सण आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. नवरात्र म्हणजे देवीचे, दुर्गेचे, नारीशक्तीचे, थोडक्यात म्हणजे प्रकृतीचे पूजन. पण आपल्याकडे नारीशक्तीचे पूजन अर्थात नारीशक्तीचा सन्मान खèया अर्थाने होतो का?, हे स्वत:लाच विचारण्याची वेळ आली आहे. दसèयाच्या आधीच्या नवरात्री उत्सवप्रिय भारतीयांनी इव्हेंट म्हणूनही साजरा केला. पण, नारीशक्तीच्या पूजेच्या मौलिक संदेश समाजात आतपर्यंत झिरपतो का?, याचाच विचार करण्याची वेळ आली आहे. महिलांविषयी बेजबाबदारपणे विधाने करणारे समाजात उजळपणे वावरत असल्याचे पाहिल्यावर तर केवळ हाच विचार करण्याची नव्हे तर आपण खरेच प्रगत आणि लोकशाहीवादी देशात राहतो का?, हाच प्रश्न आपल्याला पडायला लागतो. खरे तर आज जगात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने एवढेच नव्हे तर त्यांच्याही पुढे जाऊन अनेक क्षेत्रे काबिज केली आहेत. भारतातही राष्ट्रपतीपदापासून फायटर विमानांच्या पायलट होण्यापर्यंतचा पल्ला स्त्रियांनी सहज पार केला आहे. भारतीय लोकशाही पद्धतीने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात संधी मिळवून देण्याची वैशिष्ट्य कामगिरी केली आहे, हे अगदी खरे आहे. पण त्याचवेळी आजच्या एकविसाव्या शतकातही स्त्रियांना पुरुषांच्या तुनलेत कमी समजण्याची, तसेच काहीवेळा घरातच डांबून ठेवण्याची प्रवृत्तीही भारतात अजून कायम आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही. कधी खाप पंचायतीसारख्या पुराणमतवादी संस्था ‘स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि अत्याचार टाळायचे असतील, तर त्यांचा विवाह सोळाव्या वर्षीच उरकायला हवाङ्क, असे बुरसटलेले विचार समाजावर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. तर कधी बहुजन समाज पक्षाचे खासदार राजपाल सैनी ‘मुलींना मोबाईल वापरायला देऊच नयेतङ्क, अशी विधाने करीत आहेत. स्त्री स्वातंत्र्याच्या काळात खाप पंचायती आणि खासदार सैनी यांच्यासारख्यांची मते ऐकली की, आपण खरेच प्रगत भारतात राहतो का?, हा विचार करावाच लागेल. आपल्या एका परिचिताची मुलगी घरातून पळून गेली म्हणून ‘मुलींना मोबाईलच वापरायला देऊ नकाङ्क, असे खा. सैनी म्हणतात याचा अर्थ मोबाईल नव्हते त्या काळात अशा घटना घडतच नव्हत्या, असा होतो का? आज रोटी, कपडा, मकानप्रमाणेच मोबाईल ही देखील जीवनावश्यक वस्तू बनली आहे. अर्थात, त्याच्या वापराबरोबरच गैरवापरही वाढला आहे, हेही मान्य आहे. पण खा. सैनी यांचे मत मोबाईलच्या या वाढत्या गैरवापराबाबतच होते, असे नक्कीच नाही. खरे तर त्यांच्या म्हणण्याचा मूळ रोख हा मुलींना स्वातंत्र्य देताच कामा नये, असा आहे, हेच सत्य आहे. मुलींच्या घरातून पळून जाण्याला केवळ मोबाईलच कारणीभूत ठरतो, असे सैनी यांना म्हणायचे आहे का? आजही अनेक घरांमध्ये मुलींना तुच्छतेची वागणूक दिली जाणे, मुलगा आणि मुलगी यांच्यात पक्षपात करणे, मुलांना पौष्टिक आणि चांगलेचुंगले खायला द्यायचे अन् मुलींना मात्र कामाच्या रगाड्याला जुंपायचे, वारंवार मुलींना टाकून बोलायचे असे प्रकार सर्रास सुरू असतात. मुलींच्या पळून जाण्यामागे मूळ कारण हे नसावे, असे सैनी यांना वाटते का? मुलींच्या पळून जाण्यामागे घरातील हेच वातावरण बहुतांशवेळा कारणीभूत असते, हे मान्यच करायला हवे. पण ज्या पक्षाच्या अध्यक्षाच महिला आहेत, त्याच बहुजन समाज पक्षाचे प्रतिनिधित्त्व संसदेत करणाèया सैनी यांच्यासारख्या खासदाराला हे कळू नये, याचेच आश्चर्य वाटते. आज देशातील चार मोठ्या पक्षांच्या प्रमुख महिला आहेत. त्यात स्वयंप्रेरणा आणि स्वयंकर्तृत्वाच्या बळावर या पदांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. अनेक राज्यांनी महिलांना राजकीय सत्तेत ५० टक्के वाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत राजकीय क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण केले जात आहेत. त्याचवेळी दुसरीकडे समाजामध्ये महिलांना आपल्या मूलभूत हक्कांसाठी झगडावे लागत आहे. खाप पंचायतींसारख्या जुलमी निवाड्यांचा आघात त्यांना सहन करावा लागत आहे. पुरुषी अहंकार आणि पाशवी वर्चस्ववादी मानसिकतेमुळे त्यांना सर्वस्व आणि अनेकदा प्राणही गमवावे लागत आहे, हेही सत्य आहे. त्यातच महिला आणि मुलींविषयी वाट्टेल तशी बेजबाबदार विधाने करण्याची प्रवृत्तीही बोकाळत चालली आहे. ही विधाने आणि ती करणारे वाचाळवीर महिलांविरोधी मानसिकतेला बळच देत आहेत. हे आता थांबायलाच हवे. महिलांच्या समाजातील वर्तवणुकीबद्दल वेगवेगळी विधाने केली, की फुकटची प्रसिद्धी मिळते, असे वाटणाèयांना चाप बसवण्याची वेळ आली आहे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये या समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करणाèयांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. अगदी तशीच शिक्षा महिलांविषयी आक्षेपार्ह विधाने करणाèयांनाही देण्याची गरज आहे. पण त्याबरोबरच राजकीय पक्षांनीही आपले नेते जर अशी विधाने करणार असतील, तर त्यांना थेट राजकीय अडगळीत टाकण्याचे कणखर निर्णय घेतले पाहिजेत. महिलांच्या विरोधात वाह्यात विधाने केल्यास आपले राजकीय भवितव्यच अंधारात सापडू शकते, असा धडा ज्यावेळी सैनीसारख्या नेत्यांना शिकवला जाईल, त्याचवेळी खèया अर्थाने भारत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने योग्य वाटचाल करीत आहे, हे जगाला कळेल. आज आपण भारत प्रगतीशील राष्ट्र आहे असे म्हणतो. पण त्यासाठी आधार घेतला जातो, तो देशाच्या वाढत्या जीडीपी दराचा, देशातील वाढत्या अब्जाधिशांच्या संख्येचा अन् देशात वाढत्या संगणक अभियंत्यांच्या संख्येचा. पण आपल्या देशात किती महिला साक्षर आहेत, किती महिला कमावत्या आहेत, किती महिलांना दैनंदिन पोषण आहार मिळतो, मानसिक आणि शारीरिक अत्याचाराला बळी ठरणाèया महिलांची संख्या किती आहे, दररोज देशात किती महिला हुंडाबळी ठरतात, याच्या आकडेवारीचा विचार कोण करणार? पण मूळत: याच मुद्यांकडे आजही गांभीर्याने पाहिले जात नाही, हेच आपल्या देशातील सावित्रीच्या लेकींचे दूर्दैवच म्हणायला हवे. हा विचार आपल्या देशातील जनता आणि त्यांचे राजकीय आणि सामाजिक पातळीवर नेतृत्त्व करणारे नेते करणार नाहीत, खèया अर्थाने या देशात नारीशक्तीचे पूजन होणार नाही, तोपर्यंत आपला देश प्रगत आहे, असे म्हणण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही, हे नक्की.