खराब जीवनशैलीमुळे महिला वांझपणाच्या शिकार होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये आयोजित स्त्रीरोग विशेषतज्ज्ञांच्या संमेलनात काढण्यात आला आहे. धुम्रपान, रात्रीचे जागरण आणि अनियमित कामे आदींचा खराब जीवनशैलीत समावेश होत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. याच कारणांमुळे महिलांना मासिक धर्माच्या अनियमिततेलाही सामोरे जावे लागते. हार्मोन्सच्या कमतरतेमुळे त्यांना वांझपणा येतो. उशिरा लग्न करणे हेही एक कारण वांझपणाला जबाबदार असून, सुमारे सहा ते आठ टक्के जोडपे केवळ उशिरा लग्न केल्यामुळे पुत्रप्राप्तीपासून वंचित आहेत. याचे सर्वांत मोठे उदाहरण द्यायचे झाले तर ऐश्वर्या राय- बच्चनचे देता येईल. वयाची चाळीसी जवळ आलेल्या ऐश्वर्याला आता पुत्रप्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. वांझपणामुळे जीवनाला धोका नाही, पण त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वांझपणाला घेऊन अनेक जोडप्यांमध्ये गैरसमज आहेत. ते दूर होण्याची गरज आहे. देशात अनेक प्रगत आयव्हीएफ यंत्रणा कार्यरत असताना अजूनही लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात आणि आधीच कमी असलेला वेळ वाया घालवतात. त्यामुळे आयव्हीएफ यंत्रणेला अधिक लोकप्रिय करण्याची गरज असल्याचे या संमेलनात आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. आभा मजूमदार यांनी सांगितले. या संमेलनात देश आणि विदेशातील १०० स्त्रीरोग तज्ज्ञ सामिल झाले होते.
Home »
» खराब जीवनशैलीमुळेच महिला वांझ होण्याचे वाढते प्रमाण