प्रतिनिधी
औरंगाबाद : टेम्पो ट्रॅव्हल्सला ट्रकने दिलेल्या धडकेत औरंगाबादचे तिघे जागीच ठार तर ११ जण जखमी झाले. अस्थिविसर्जनासाठी छोट्या पंढरपूरचे हे कुटुंब अलाहाबादला निघाले होते. मध्यप्रदेशातील कटणी शहराजवळ हा अपघात घडला.
योगेश जगदीशलाल जैस्वाल (२८, रा.पंढरपूर), सुनील श्रीरामलाल जैस्वाल (४२, लाडसावंगी), राजेश रमेशलाल जैस्वाल (३५, पिंप्रीराजा) अशी मृतांची नावे आहेत. पंढरपूर येथील सुरेश बाबूलाल जैस्वाल (वय ४०) यांचा अस्थी कलश घेऊन नातेवाईक अलाहाबादला चालले होते. टेम्पो टड्ढॅव्हल्सन १४ जण अलाहाबादकडे निघाले होते. २४ ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास कटणी शहरात पोहचत असतानाच भरधाव टड्ढकने टड्ढॅव्हल्सला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती कटणी पोलिसांनी औरंगाबादेत कळविली. त्यामुळे जैस्वाल यांच्या नातेवाईकांवर पुन्हा शोककळा पसरली.