प्रतिनिधी
औरंगाबाद : जायकवाडीत धरणात भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी काल रात्री आठच्या सुमारास कायगाव टोका येथे बॅकवॉटरमध्ये मिसळले. सुमारे ८५ तासांचा प्रवास करून हे पाणी जायकवाडीत आल्याने मराठवाड्यात आनंदोत्सवच साजरा झाला आहे.
जायकवाडीत केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तेवढ्यावर अवघ्या मराठवाड्याची तहान भागवणे शक्य नसल्याने अतिरिक्त पाणीसाठा हवा होता. तो काही प्रमाणात मिळाला आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्याने जायकवाडीच्या हक्काचे पाणी शेतीसाठी पळविल्याचे लक्षात आल्यानंतर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर वरील धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. सरकारने नमते घेत मग नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यास आदेशित केले. त्यामुळे २१ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता भंडारदरातून पाणी सोडले गेले.