प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची साथ पसरली असून, दहापैकी दोन घरांत तरी डेंग्यूचा रुग्ण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यात आरोग्य यंत्रणा सपशेल अवयशी ठरल्याचे दिसून येत आहे. उपाययोजना कूचकामी ठरल्याने आता किमान रुग्णांवर तरी वेळीच उपचार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या १५ दिवसांत डेंग्यूमुळे तीन शहरवासियांचा मृत्यू झाल्याने डेंग्यूचे गांभीर्य आता तरी प्रशासनाला समजावे, अशी मागणी होत आहे.
एडिस इजिप्त या जातीचा डास चावल्याने डेंग्यूची लागण होते. हे डास सध्या औरंगाबादेत मोठ्या प्रमाणावर ठाण मांडून आहेत. उंच उडू न शकणारे हे डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतात आणि पैदास वाढवतात. हे डास बहुतेक वेळा पायांनाच चावतात. त्यामुळे नागरिकांनी अंगावर घेऊन झोपले पाहिजेत. किमान पाय तरी झाकून ठेवून झोपायला हवे. शहरातील अनेकांना डेंग्यूची लागण झाल्याने सरकारी तसेच खासगी दवाखाने या रोगाच्या रुग्णांनी भरून गेले आहेत. थोडा जरी ताप आला तरी नागरिकांनी तातडीने डॉक्टरांना भेटून हा डेंग्यू तर नाही ना, याची खात्री करून घेतली पाहिजेत. सरकारी रुग्णालयांत डेंग्यूच्या रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे असून, बहुतांश वॉर्ड रुग्णालयांत ही यंत्रणा अजूनही नाही. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण घाटीत पाठविण्याचे काम तेथील डॉक्टर करतात. रुग्णाला डेंग्यूच झाल्याचे निष्पन्न न झाल्याने शहरातील तिघांचा या रोगाने मृत्यू झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखणे हा एकमेव उपाय डेंग्यूला आवर घालण्यासाठी असल्याने मनपाने त्यादृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.